Kapoor Family With PM Modi : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेता सैफ अली खान यांनी आपल्या कपूर कुटुंबासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांनी त्यांची मुले तैमूर आणि जेह यांच्यासाठी पंतप्रधानांचा ऑटोग्राफही घेतला. यावेळी मोदींनी कपूर कुटुंबासोबत आणि सैफ अली खानसोबत गप्पा मारल्या. याचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे.