'थ्री इडियट्स' या बॉलिवूड चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे ओमी वैद्य. त्याची 'चतूर' ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. आता ओमी हा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. तो 'आईच्या गावात मराठीत बोल' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने अनेक मजेशीर किस्से सांगितले आहेत.