'आयच्या गावात मराठी बोल' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ओमी वैद्य आणि पार्थ भालेराव महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. पार्थ या चित्रपटात रवी नावाच्या कॅब ड्रायवरची भूमिका साकारणार आहे. जेव्हा चित्रपटाची ऑफर आली तेव्हा पार्थला ड्रायविंग देखील येत नव्हते. हा किस्सा पार्थ आणि ओमीने स्वत: 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितला आहे.