Yusuf Pathan : दुबईत युसूफ पठाणची तुफानी खेळी, इरफान आणि अब्बाजान यांनीही लुटला फटकेबाजीचा आनंद
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Yusuf Pathan : दुबईत युसूफ पठाणची तुफानी खेळी, इरफान आणि अब्बाजान यांनीही लुटला फटकेबाजीचा आनंद

Yusuf Pathan : दुबईत युसूफ पठाणची तुफानी खेळी, इरफान आणि अब्बाजान यांनीही लुटला फटकेबाजीचा आनंद

Jan 29, 2023 06:19 PM IST

Yusuf Pathan ILT20 : यूएईमध्ये सुरू असलेल्या इंटरनॅशनल क्रिकेट लीगचा २०वा सामना दुबई कॅपिटल्स आणि डेझर्ट वायपर्स यांच्यात झाला. या सामन्यात दुबई कॅपिटल्सकडून खेळताना युसूफ पठाणने २६ चेंडूत ३५ धावा केल्या.

Yusuf Pathan ILT20
Yusuf Pathan ILT20

युसूफ पठाणने आपल्या छोट्याशा कारकिर्दीत तो किती स्फोटक फलंदाज आहे हे नेहमीच सिद्ध केले आहे. टीम इंडियानंतर आयपीएलमध्येही त्याने आपल्या धमाकेदार स्टाईलने चाहत्यांचे मनोरंजन केले. आयपीएलनंतर त्याने रोड सेफ्टी टूर्नामेंटमध्येही आपली छाप सोडली. आता इंटरनॅशनल टी-20 लीगमध्येही युसूफ पठाण षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडत आहे. वयाच्या ४० व्या वर्षीदेखील तो गोलंदाजांची धुलाई करत आहे.

यूएईमध्ये सुरू असलेल्या इंटरनॅशनल क्रिकेट लीगचा २०वा सामना दुबई कॅपिटल्स आणि डेझर्ट वायपर्स यांच्यात झाला. या सामन्यात दुबई कॅपिटल्सकडून खेळताना युसूफ पठाणने २६ चेंडूत ३५ धावा केल्या. यादरम्यान त्याने ३ चौकार आणि २ गगनचुंबी षटकार ठोकले. मात्र, असे असूनही तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. डेझर्ट वायपर्सने १२ धावांनी सामना जिंकला. पण चाहत्यांची मनं पठाणने जिंकली. युसूफची ही खेळी त्याचे अब्बा जानही ​​घरी बसून पाहत होते. युसूफचा धाकटा भाऊ इरफान पठाणने याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दुबई कॅपिटल्सने इंस्टाग्रामवर युसूफच्या खेळीबद्दल पोस्ट केली आहे. तसेच, 'विंटेज पठाण..' असे कॅप्शन या पोस्टला दिले आहे.

दरम्यान या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या डेझर्ट वायपर्सने २० षटकात ९ बाद १४९ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून कॉलिन मुनरोने ३२ चेंडूत सर्वाधिक ४० धावांची खेळी केली. तर दुबई कॅपिटल्सकडून अॅडम झाम्पाने ३ बळी घेतले. प्रत्युत्तरात दुबई कॅपिटल्सचा संघ ५ गड्यांच्या मोबदल्यात १३७ धावाच करू शकला.

Whats_app_banner