Year Ender Sports : टी-20 वर्ल्डकप, पॅरिस ऑलिम्पिक ते चेस चॅम्पियनशीप… भारतासाठी कसं राहिलं हे वर्ष, जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Year Ender Sports : टी-20 वर्ल्डकप, पॅरिस ऑलिम्पिक ते चेस चॅम्पियनशीप… भारतासाठी कसं राहिलं हे वर्ष, जाणून घ्या

Year Ender Sports : टी-20 वर्ल्डकप, पॅरिस ऑलिम्पिक ते चेस चॅम्पियनशीप… भारतासाठी कसं राहिलं हे वर्ष, जाणून घ्या

Dec 17, 2024 12:45 PM IST

Year Ender 2024 Sports : भारतीय क्रीडा विश्वासाठी २०२४ हे वर्ष चढ-उतारांनी भरलेले होते. टी-20 विश्वचषक आणि ऑलिम्पिकमध्ये भारताने चांगली कामगिरी केली.

Year Ender Sports : टी-20 वर्ल्डकप, पॅरिस ऑलिम्पिक ते चेस चॅम्पियनशीप… भारतासाठी कसं राहिलं हे वर्ष, जाणून घ्या
Year Ender Sports : टी-20 वर्ल्डकप, पॅरिस ऑलिम्पिक ते चेस चॅम्पियनशीप… भारतासाठी कसं राहिलं हे वर्ष, जाणून घ्या

गेल्या काही वर्षात भारतात खेळाचे नवे पर्व सुरू झाले आहे. भारत आता केवळ क्रिकेटमध्येच नाही तर बॅडमिंटन, बुद्धीबळ, हॉकी, नेमबाजी आणि भालाफेक यांसारख्या स्पर्धांमध्येही आंतरराष्ट्रीय स्टार उदयास येत आहेत. 

२०२४ या वर्षाबद्दल बोलायचे झाले तर या वर्षी पॅरिस ऑलिम्पिक, टी-20 क्रिकेट विश्वचषक, ऍथलेटिक्समधील डायमंड लीगची फायनल आणि महिला हॉकीमधील आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी या प्रमुख स्पर्धा झाल्या. अशा स्थितीत आपण २०२४ हे वर्ष भारताच्या क्रीडा क्षेत्रासाठी कसे होते हे जाणून घेऊया.

क्रिकेटमध्ये टी-20 विश्वचषक जिंकला

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला होता. टी-20 विश्वचषक २०२४ ची पाळी आली तेव्हा टीम इंडिया पुन्हा एकदा फायनलमध्ये पोहोचली, जिथे भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी झाला. रोमहर्षक फायनलमध्ये भारताने आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ६ पदके जिंकली

ऑलिम्पिकमधील पदकांची संख्या दुहेरी आकड्यात नेण्यात भारतीय संघ पुन्हा एकदा अपयशी ठरला. मनू भाकरने नेमबाजीत २ कांस्यपदक जिंकून बरीच चर्चा मिळवली होती. तिच्याशिवाय नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले. भारताने नेमबाजीत ३ पदके, ॲथलेटिक्स, हॉकी आणि कुस्तीमध्ये प्रत्येकी एक पदक जिंकले.

पॅरालिम्पिकमध्ये भारताचा दबदबा

यावर्षी भारताने पॅरालिम्पिकच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी केली आणि एकूण २९ पदके जिंकली. जी गेल्या वेळेपेक्षा १० पदके अधिक आहेत. भारताला ॲथलेटिक्समध्ये १७ पदके, बॅडमिंटनमध्ये ५, नेमबाजीमध्ये ४, तिरंदाजीमध्ये २ आणि ज्युडोमध्ये एक पदक मिळाले.

तिरंदाजी विश्वचषकात ७ सुवर्णांसह १५ पदकं जिंकली

तिरंदाजी विश्वचषक एप्रिलमध्ये आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आणि एकूण १५ पदके जिंकली. त्या स्पर्धेत भारताने ७ सुवर्ण, ५ रौप्य आणि ३ कांस्य पदके जिंकली. भारताची बहुतेक पदके सांघिक स्पर्धांमध्ये आली, परंतु भारतीय तिरंदाजांना एकेरीच्या स्पर्धांमध्ये संघर्ष करावा लागला.

डी गुकेश बुद्धिबळ चॅम्पियन बनला

डोम्माराजू गुकेशने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकून इतिहास रचला. विश्वविजेता बनणारा तो जगातील सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरला. त्याने अंतिम फेरीत १४ व्या फेरीत चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

महिलांनी आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली

महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारताने आपला झेंडा फडकवला. भारतीय हॉकी संघाने संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. टीम इंडियाने फायनलमध्ये चीनचा १-० असा पराभव करून इतिहास रचला होता. भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावण्याची ही तिसरी वेळ होती.

Whats_app_banner
विभाग