मराठी बातम्या  /  क्रीडा  /  John Cena : डब्लूडब्लूई स्टार जॉन सीनाची निवृत्तीची घोषणा; जाणून घ्या कधी आणि कुठे खेळणार शेवटचा सामना?

John Cena : डब्लूडब्लूई स्टार जॉन सीनाची निवृत्तीची घोषणा; जाणून घ्या कधी आणि कुठे खेळणार शेवटचा सामना?

Jul 08, 2024 10:16 AM IST

John Cena Retirement: डब्लूडब्लूई स्टार जॉन सीनाने निवृत्तीची घोषणा केली असून २०२५ मध्ये तो आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम लावणार असल्याची माहिती दिली.

डब्लूडब्लूई स्टार जॉन सीनाची निवृत्तीची घोषणा
डब्लूडब्लूई स्टार जॉन सीनाची निवृत्तीची घोषणा

WWE: डब्लूडब्लूईच्या रिंगणात भल्याभल्या आसमान दाखवणारा स्टार कुस्तीपटू जॉन सीनाने निवृत्तीची घोषणा केली. लवकरच तो त्याच्या उत्कृष्ट कारकिर्दीवर पूर्णविराम लावणार आहे. जॉन सीनाने 'मनी इन द बँक २०२४' च्यादरम्यान निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना मोठा धक्का दिला. या कार्यक्रमात जॉन सीना 'द लास्ट टाइम इज नाऊ' लिहिलेला टी-शर्ट घालून आला होता. १६ वेळच्या विश्वविजेत्याची अचानक निवृत्ती घेतल्याने त्याचे चाहते निराश झाले. जॉन सीना २०२५ मध्ये डब्ल्यूडब्ल्यूईमधील शेवटचा सामना खेळेल, अशीही त्याने माहिती दिली.

डब्लूडब्लूई युनिव्हर्सला संबोधित करताना जॉन सीना म्हणाला की, "मी इथे का आहे? मी डब्लूडब्लूईमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा करत आहे. २०२५ च्या जानेवारी महिन्यात नेटफ्लिक्सवर येत आहे, ज्यात मला सहभागी व्हायचे आहे. ही पहिलीच वेळ आहे आणि मी तिथे येईन. २०२५ चा रॉयल रंबल हा माझा शेवटचा सामना असेल. २०२५ एलिमिनेशन चेंबर हे माझे शेवटचं असेल. लास वेगासमध्ये रेसलमेनिया २०२५ हा मी भाग घेणारा शेवटचा रेसलमेनिया असेल, असे जाहीर करण्यासाठी मी आज रात्री येथे आलो आहे", असे सीना म्हणाला.

ट्रेंडिंग न्यूज

२००२ मध्ये डब्लूडब्लूईच्या रिंगणात पाऊल ठेवणाऱ्या जॉन सीनाने पुढे जाऊन आपल्या खेळाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर भुरळ घातली. तो आपल्या कारकिर्दीत १६ वेळा विश्वविजेता ठरला. त्याने डब्लूडब्लूईमधील स्टार कुस्तीपटू ट्रिपल एच, द रॉक, सीएम पंक आणि रँडी ऑर्टन यांनाही टक्कर दिली.डब्ल्यूडब्ल्यूई कारकिर्दीव्यतिरिक्त जॉन सीनाने हॉलिवूडमध्येही काम केले. त्याने द इंडिपेंडंट, फास्ट एक्स आणि द सुसाइड स्क्वाड सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले.

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

एका सोशल मीडिया युजरने कमेंट केली की, 'तुम्हाला मिस करेन चॅम्पियन. "त्याला आधीच खूप मिस केले आहे. मला विश्वासच बसत नाही की हे खरे आहे," असं दुसऱ्या युजरने लिहिले आहे. "जॉन सीनाला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! सीनाशिवाय डब्ल्यूडब्ल्यूई पाहणे कठीण असेल", असे एका युजरने लिहिले आहे. काहींनी लिहिले आहे की, “मला खात्री आहे की, तो पुन्हा येईल”.

 

WhatsApp channel
विभाग