मराठी बातम्या  /  Sports  /  Wtc Final 2023 Prize Money Announced For Icc World Test Championship Cycle Ind Vs Aus Oval Rohit Sharma Vs Cummins

WTC Final Prize Money : टेस्ट चॅम्पियनशीपचा विजेता-उपविजेता मालामाल होणार, पाकच्या झोळीत किती पडणार? पाहा

world test championship prize money
world test championship prize money
Rohit Bibhishan Jetnavare • HT Marathi
Jun 01, 2023 11:37 AM IST

icc world test championship prize money : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये विजेत्या संघाला १३ कोटी रुपये दिले जातील, तर उपविजेता संघही मालामाल होईल. ३१ कोटींहून अधिकची बक्षीस रक्कम ९ संघांमध्ये वाटली जाईल.

WTC Championship Prize money : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND VS AUS WTC FINAL) यांच्यात ७ जूनपासून लंडनच्या ओव्हल मैदानावर होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) विजेत्या संघाला मिळणारी रक्कम जाहीर केली आहे. टेस्ट चॅम्पियन बनणाऱ्या संघाला १३ कोटींहून अधिकची बक्षीस रक्कम मिळेल. म्हणजे टीम इंडियाला ही रक्कम जिंकण्याची संधी आहे. त्याचबरोबर पाकिस्तानलाही लाखोंमध्ये पैसे मिळणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

आयसीसीने सांगितल्यानुसार, ९ संघांमध्ये ३१ कोटींहून अधिकची बक्षीस रक्कम वाटली जाईल. हे असे संघ आहेत ज्यांनी २०२१-२३ दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भाग घेतला आहे.

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ (ICC World Test Championship 2023) च्या विजेत्याला १.६ मिलियन डॉलर्स (रु.१३ कोटींपेक्षा जास्त रक्कम) मिळेल. त्याच वेळी, उपविजेत्याला ८ मिलियन डॉलर (रु. ६.५ कोटी) मिळतील.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सांगितले की, WTC च्या बक्षीस रकमेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. WTC च्या २०१९-२१ सीझनमध्ये जी बक्षीस रक्कम होती तीच यावेळी देखील आहे. अशा स्थितीत त्यात कोणतीही वाढ झालेली दिसत नाही.

२०२१ मध्ये, WTC फायनल न्यूझीलंड आणि भारत यांच्यात साउथॅम्प्टनमध्ये आयोजित करण्यात आली होती. पावसामुळे त्या सामन्याचा निकाल सहाव्या दिवशी लागला. त्यावेळी न्यूझीलंड संघाने WTC फायनलमध्ये ८ गडी राखून विजय मिळवला होता.

पाकिस्तानला किती पैसे मिळणार?

३१ कोटी रूपयांची रक्कम आयसीसी सर्व संघांमध्ये वाटणार आहे. दक्षिण आफ्रिका या तिसर्‍या क्रमांकाच्या संघाला ३.७० कोटीची रक्कम मिळेल. चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या इंग्लंड संघाला २.८९ कोटी रुपये दिले जातील. पाचव्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेच्या संघाला १.६५ कोटी रुपये मिळतील.

WTC मध्ये सहाव्या क्रमांकावर न्यूझीलंड, सातव्या क्रमांकावर पाकिस्तान, आठव्या क्रमांकावर वेस्ट इंडिज आणि नवव्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेशला प्रत्येकी ८२ लाख रुपये मिळतील.

WhatsApp channel