सांगली येथील युवा पैलवान सूरज निकम याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सूरज निकम 'कुमार महाराष्ट्र केसरी' हा कुस्तीपटू होता. सुरज निकम याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपास करत आहेत.
सूरजच्या आत्महत्येने कुस्ती क्षेत्रातील अनेकांना धक्का बसला आहे. तसेच, सांगलीच्या कुस्ती क्षेत्रात शोककळा पसरली आहे. पैलवान सूरज निकम हा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नागेवाडी गावचा रहिवासी होता.
सुरज निकम हा नामवंत आणि कुशल मल्ल होता. त्याने यापूर्वी कुस्ती क्षेञातील अनेक किताब पटाकवले आहेत. त्याने अल्पावधीतच आपला कुस्ती क्षेत्रात दबदबा निर्माण करत कुमार महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला. कुस्तीच्या आखाड्यात अनेक मल्लाना त्याने चितपट केले होते.
सूरज निकम याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याची माहिती अद्याप मिळाली नाही. पण तो त्याच्या वडिलांच्या निधनाने व्यथित होता, अशी माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
संबंधित बातम्या