मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WPL समोर IPL सुद्धा फेल, पहिल्याच सामन्यात झाला हा वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा

WPL समोर IPL सुद्धा फेल, पहिल्याच सामन्यात झाला हा वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 05, 2023 10:30 AM IST

wpl 2023 GG VS MI : महिला प्रीमियर लीगचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात झाला. डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने १४३ धावांनी विजय मिळवला.

wpl 2023 GG VS MI
wpl 2023 GG VS MI

WPL VS IPL, GG VS MI महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सीझनला दणक्यात सुरुवात झाली. शनिवारी (४ मार्च) खेळल्या गेलेल्या या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा १४३ धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सच्या संघाने ५ गडी गमावून २०७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरात जायंट्सचा संघ ६४ धावांत गडगडला.

मुंबई इंडियन्सचा १४३ धावांनी विजय हा महिलांच्या T20 क्रिकेटच्या इतिहासातील कोणत्याही संघाचा सर्वात मोठा विजय आहे. याआधी, महिलांच्या T20 क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम १२२ धावांचा होता, जो वेलिंग्टनने २०२१ मध्ये ओटागोविरुद्ध मिळवला होता. महिला प्रीमियर लीग ज्या स्फोटक पद्धतीने सुरू झाली आहे, ते पाहता यासमोर इंडियन प्रीमियर लीग (IPL) फिकी पडताना दिसत आहे.

IPL च्या पहिल्या सामन्यात KKRने RCBचा १४० धावांनी पराभव केला होता

इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात २००८ साली झाली होती. त्यावेळी सलामीचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात झाला. त्या सामन्यात केकेआरने आरसीबीचा १४० धावांनी पराभव केला होता, तर डब्ल्यूपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबईने गुजरातचा १४३ धावांनी पराभव केला आहे.

आयपीएलच्या उद्घाटनाच्या सामन्यात केकेआरने २२२ धावा केल्या होत्या, तर डब्ल्यूपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने २०७ धावा केल्या. ब्रेंडन मॅक्क्युलमने RCB विरुद्ध नाबाद १५८ धावा करून IPL ची झंझावाती सुरुवात केली होती, तर हरमनप्रीत कौरने देखील या WPL च्या पहिल्याच सामन्यात आपल्या धडाकेबाज फलंदाजीने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले.

सामन्यात काय घडलं?

मुंबईच्या बलाढ्य संघासमोर गुजरातचे खेळाडू दुबळे दिसले. कर्णधार हरमनप्रीत कौरचे झंझावाती अर्धशतक आणि सायका इशाकच्या किलर बॉलिंगने संघाला विजय मिळवून दिला. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मुंबईने २० षटकांत ५ गडी गमावून २०७ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ १५.१ षटकांत केवळ ६४ धावाच करू शकला.

मुंबईकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक ६५ धावा केल्या. तिने ३० चेंडूं खेळीत १४ चौकार मारले. सलामीवीर हिली मॅथ्यूजने ३१ चेंडूत ४७ आणि अमेलिया केरने २४ चेंडूत नाबाद ४५ धावा केल्या.

गुजरातसाठी केवळ दयालन हेमलता आणि मोनिका पटेल यांना दुहेरी आकडा गाठता आला. हेमलताने २३ चेंडूत नाबाद २९ धावा केल्या. तिने एक चौकार मारला. हेमलताच्या बॅटमधून २ षटकारही निघाले. मुंबईकडून सायका इशाकने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या.

WhatsApp channel

संबंधित बातम्या