Viral Video: गोविंदाच्या लोकप्रिय गाण्यावर विदेशी महिला खेळाडूंचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल
UP Warriorz Dance Video: यूपी वॉरिअर्सच्या महिला खेळाडूंच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Women’s Premier League 2023: वुमन प्रीमियर लीगमध्ये यूपी वॉरियर्स संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष करत आहे. डब्लूपीएलच्या गुणतालिकेत यूपी वॉरियर्सचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. सध्या सोशल मीडियावर यूपी वॉरिअर्सकडून खेळणाऱ्या विदेशी महिला खेळाडूंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात या महिला क्रिकेटपटू बॉलिवूड अभिनेता गोविंदाचे लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओला मोठी पसंती मिळत आहे.
ट्रेंडिंग न्यूज
यूपी वॉरियर्सचा पुढचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे, पण त्या सामन्यापूर्वी ताहिला मॅकग्रा, सोफी एक्लेस्टोन आणि पार्श्वी चोप्रा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओत त्या गोविंदाचे लोकप्रिय गाणे युपी वाला ठुमका लगओ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
डब्लूपीएलमध्ये यूपी वॉरिअर्सची कामगिरी
डब्लूपीएलमध्ये यूपीच्या संघाने आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी २ सामन्यात त्यांना यश मिळाले आहे. तर, तीन सामन्यात पराभवाचा स्वीकारावा लागला आहे. यूपीचा संघ गुणतालिकेत चार गुणांसह आणि -०.१९६ च्या नेट रेटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. यूपीच्या संघाला त्यांच्या मागच्या सामन्यात बंगळुरूच्या संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. बंगळुरुच्या संघाचा या हंगामातील हा पहिलाच विजय आहे. यूपी संघ त्यांचा पुढचा सामना आज मुंबईच्या संघाशी खेळणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी यूपीच्या संघाला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकायचा आहे. यूपीचा पराभव बंगळुरुसाठी प्लेऑफचा रस्ता बनेल.
विभाग