मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Elon Musk: एलॉन मस्क यांचा रोनाल्डोच्या फुटबॉल क्लबवर डोळा, लवकरच विकत घेणार

Elon Musk: एलॉन मस्क यांचा रोनाल्डोच्या फुटबॉल क्लबवर डोळा, लवकरच विकत घेणार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 17, 2022 11:22 AM IST

Elon Musk Manchester United: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी इंग्लिश फुटबॉल क्लब विकत घेण्याचे ठरवले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही घोषणा केली आहे. मस्कच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

Elon Musk
Elon Musk

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मस्क यांनी इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड पीएलसी विकत घेणार असल्याची घोषणा केली आहे. यानंतर सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, एलॉन मस्क यांनी सोशल मीडियावर काही राजकीय ट्विट्स केली आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी जाहीर केले आहे, की ते इंग्लंडचा फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड विकत घेणार आहेत. विशेष म्हणजे पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोही याच क्लबकडून खेळतो.

मात्र, क्लबच्या खरेदीबाबत एलॉन मस्क यांनी कोणतीही तपशीलवार माहिती दिलेली नाही. वास्तविक, मस्क यांनी एक ट्विट केले होते. ज्यात त्यांनी लिहिले होते की, 'मी हे स्पष्ट करतो की मी रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाला समान पाठिंबा देतो.'

यानंतर, मस्क यांनी पुढील ट्विटमध्ये लिहिले की , 'मी मँचेस्टर युनायटेडदेखील खरेदी करणार आहे. तुमचे स्वागत आहे.' मस्क यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

सतत चर्चेत राहणे ही मस्क यांची ओळख

एलोन मस्क हे वादग्रस्त वक्तव्यांसाठी आणि ट्रेंडमध्ये राहण्यासाठी ओळखले जातात. यावेळीही त्यांनी असेच काही ट्विट केले आहेत, जे आता ट्रेंडमध्ये आले आहेत. आता त्यांनी ट्विटरवर मँचेस्टर युनायटेडला विकत घेण्याची घोषणा केली आहे, परंतु यावेळी ते या खरेदीसाठी किती गंभीर आहेत याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

दरम्यान, इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड सध्या अमेरिकेतील ग्लेसर कुटुंबाच्या ताब्यात आहे. मस्क यांच्या या ट्विटनंतर ग्लेसर कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्याचवेळी, या एका ट्विटनंतर मस्क यांनी याबाबत कोणतेही विधान किंवा ट्विट केलेले नाही.

 

WhatsApp channel