जगप्रसिद्ध बेलारशियन बॉडीबिल्डर इलिया गोलेम येफिमचेक याचे निधन झाले. इलिया ३६ वर्षाचा होता. तो त्याच्या शरीराच्या आकारामुळे लोकप्रिय होता. त्याच्या अतुलनीय शरीरयष्टीमुळे त्याला 'वर्ल्ड्स मोस्ट डेंजरस बॉडीबिल्डर' ही पदवी मिळाली होती.
तो अनेकदा सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असे आणि त्याचे लाखो फॉलोअर्स होते.
बॉडीबिल्डिंगच्या जगात त्याला इलिया गोलेम या नावाने प्रसिद्धी मिळाली. त्याचे खरे नाव इलिया येफिमचिक असे होते. इलियाच्या मृत्यूचे अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याच्या पत्नी अॅना हिने सांगितले की, ६ सप्टेंबरला सकाळी गोलेमला अचानक अस्वस्थ वाटू लागले.यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. दोन दिवसांनी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
इलियाच्या शरीराच्या आकाराचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो, की त्याची छाती ६१ इंच होती आणि बायसेप २५ इंच होते. त्याचे वेटलिफ्टिंग ७००-पाऊंड स्क्वॅट, ७००-पाऊंड डेडलिफ्ट आणि ६००-पाऊंड बेंच प्रेस होते. इलिया गोलेमचे वजन १६० किलो होते. त्याला दिवसांतून ७ वेळा जेवण करावे लागायचे.
बेलारूसमधील गोलेमला लहान वयातच शारीरिक व्यायामाची आवड निर्माण झाली. तो त्याच्या अभ्यासासाठी झेक प्रजासत्ताकला गेला आणि तेथेही व्यायाम करत राहिला. चेक रिपब्लिकमधील ६ फूट गोलेमने आहार आणि व्यायामाच्या माध्यमातून आपल्या शरीराला एका महाकाय रुपात बदलले.
सिल्वेस्टर स्टॅलोन आणि अरनॉल्ड श्वार्झनेगर यांच्यालारेखे दिसणे हे गोलेमचे ध्येय होते. बेलारूस आणि झेकमध्ये बॉडी बिल्डिंगला प्रोत्साहन देण्यासाठीही तो ओळखला जातो.
बॉडी बिल्डिंगच्या जगाशी संबंधित लोकांच्या मृत्यूच्या बातम्या अलीकडच्या काळात सातत्याने समोर येत आहेत. गोलेमच्या आधी ब्राझीलचा बॉडीबिल्डर मॅथ्यूस पावलक त्याच्या घरात मृतावस्थेत सापडला होता. लहानपणी लठ्ठपणाशी झुंज दिल्यानंतर पावलकने बॉडीबिल्डिंगमध्ये नाव कमावले.
बॉडी बिल्डिंगमधील अनेक प्रकारच्या जोखमींबद्दल तज्ञ बोलत आहेत, कारण यामध्ये खेळाडू अनेकदा शरीराला त्याच्या मर्यादेपलीकडे ढकलतात आणि वजन उचलण्याचा प्रयत्न करतात. आधुनिक काळात बॉडी बिल्डिंगमध्ये विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या वापरावरही तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
संबंधित बातम्या