ICC Releases World Cup Promo Video : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चे आयोजन भारतात होणार आहे. स्पर्धेची सुरुवात ५ ऑक्टोबर रोजी गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. तर याच मैदानावर १५ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला रंगणार आहे. अशातच आता ICC ने वर्ल्ड कप 2023 चा प्रोमो व्हिडिओ लाँच केला आहे.
आयसीसीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या २ मिनिट १३ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये, ICC ने ऐतिहासिक विश्वचषक सामन्यांची झलक दाखवली आहे. या सोबतच चाहत्यांच्या वेगवेगळ्या भावनाही दाखवण्यात आल्या आहेत.
या व्हिडिओमध्ये काही भावनिक क्षणही जोडण्यात आले आहेत. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची हतबलता ते २०११ वर्ल्डकप फायनलमधील धोनीचा षटकार, हे प्रसंग या व्हिडीओत दाखवण्यात आले आहेत. व्हिडिओमध्ये बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान तसेच प्रसिद्ध क्रिकेटपटू-जेपी ड्युमिनी, दिनेश कार्तिक, इऑन मॉर्गन, मुथय्या मुरलीधरन, जॉन्टी रोड्स आणि जेमिमाह रॉड्रिग्ज देखील आहेत.
क्रिकेटमधील ऐतिहासिक क्षणांमध्ये वेस्ट इंडिजने जिंकलेला पहिला एकदिवसीय विश्वचषक, कपिल देव यांनी लॉर्ड्सच्या मैदानावर घेतलेले वर्ल्डकप ट्रॉफीचे चुंबन, असे अनेक सुंदर क्षण जोडले गेले आहेत.
व्हिडिओमध्ये 'मॅच कट्स'च्या जादूद्वारे नऊ भावनांचे चित्रण करण्यात आले आहे. यामध्ये प्राइड मोमेंट, पॅशन, ब्रेव्हरी, इमोशन, रिसपेट्क, पावर, हॅप्पीनेस, वन्डर अँड ग्लोरी यांसारख्या क्षणांचा समावेश आहे. क्रिकेट चाहत्यांना सामना पाहताना या ९ भावनांचाच सर्वाधिक अनुभव येतो.
हा व्हिडिओ लॉन्च करण्यापूर्वी, ICC ने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शाहरुख खानचा ट्रॉफीसोबतचा फोटो शेअर केला होता.