मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Nikhat Zareen: महिंद्राकडून भारतीय बॉक्सर निकहत जरीनला महिंद्रा थार गिफ्ट
Nikhat Zareen
Nikhat Zareen

Nikhat Zareen: महिंद्राकडून भारतीय बॉक्सर निकहत जरीनला महिंद्रा थार गिफ्ट

28 March 2023, 19:46 ISTAshwjeet Rajendra Jagtap

Nikhat Zareen: वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या भारताची महिला बॉक्सर निकहत जरीनला महिंद्रा कंपनीने महिंद्रा थार गिफ्ट केली.

Nikhat Zareen: महिंद्रा अँड महिंद्राने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या निकहत जरीनला नवीन महिंद्रा थार गिफ्ट दिली आहे. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात निकहत जरीनने व्हिएतनामच्या बॉक्सरला ५-० ने पराभूत करून सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर तिला एक लाख डॉलर बक्षीस रक्कम म्हणून मिळाली. या रकमेतून निकत मर्सिडीज लक्झरी कार घेण्याचा विचार करत होती. परंतु नवीन महिंद्रा थार मिळाल्यानंतर तिने आपला विचार बदलला. आता ती या रकमेसह तिच्या पालकांना हजला पाठवणार आहे. याची माहिती महिंद्राने एक ट्विट करून दिली. तसेच त्यांनी निकहतचे अभिनंदन केले.

ट्रेंडिंग न्यूज

निकहत जरीनने महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२३ च्या ५० किलो वजन गटाच्या अंतिम फेरीत व्हिएतनामची दोन वेळची आशियाई चॅम्पियन गुयेन थी टॅमचा पराभव केला. पहिल्या फेरीत दोघांमध्ये चुरशीची लढत झाली आणि टॅमने जोरदार मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला पण निर्णय निखतच्या बाजूने गेला. दुसरी फेरी टॅमसाठी २-३ अशी होती. पण तिसर्‍या फेरीत निखतने आक्रमणासह उत्कृष्ट बचाव दाखवत फेरी जिंकली. मेरी कोमनंतर दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी दुसरी भारतीय ठरली. मेरी कोमने आतापर्यंत सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिपचा खिताब जिंकला आहे.

जागतिक ऑलिम्पिक भालाफेक स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राला महिंद्राने एक कस्टम कार भेट दिली होती. त्यावेळी महिद्रा कंपनीची नीरज चोप्राला नवीन एसयूव्ही७०० ही कार भेट दिली होती. याशिवाय, कंपनीने सुनीत अंतील, अवनी लेखरा यांनाही कार भेट केली होती. आनंद महिंद्रा यांनी खेळाडूंव्यतिरिक्त अनेकांना समाजसेवेसाठी अनोख्या भेटवस्तू दिल्या आहेत.

विभाग