Wimbledon prize money : विम्बल्डन आणि क्रिकेट वर्ल्डकपच्या बक्षीस रकमेत किती फरक? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Wimbledon prize money : विम्बल्डन आणि क्रिकेट वर्ल्डकपच्या बक्षीस रकमेत किती फरक? जाणून घ्या

Wimbledon prize money : विम्बल्डन आणि क्रिकेट वर्ल्डकपच्या बक्षीस रकमेत किती फरक? जाणून घ्या

Jul 17, 2023 03:56 PM IST

Wimbledon Prize Money : विम्बल्डनच्या बक्षीस रकमेत ११ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. पुरुष आणि महिला एकेरीत विजेतेपद पटकावणाऱ्या खेळाडूला बक्षीस म्हणून २५ कोटी रुपये मिळाले.

Wimbledon Prize Money
Wimbledon Prize Money

Prize Money difference between Wimbledon And IPL : स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने (carlos alcaraz wimbledon 2023) विम्बल्डन चॅम्पियनशिप 2023 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले . रविवारी (१६ जुलै) लंडनमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या अल्कारेझने दुसऱ्या मानांकित सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा १-६, ७-६ (६), ६-१, ३-६, ६- ४ असा पराभव केला. दोन्ही खेळाडूंमधील हा सामना ४ तास ४२ मिनिटे चालला. अल्कारेझच्या कारकिर्दीतील हे दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे.

दरम्यान, विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील विजेत्याला किती बक्षीस रक्कम मिळते, हे तुम्हाला माहीत आहे का? विम्बल्डन 2023 मधील बक्षिसाच्या रकमेत यावेळी ११ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. ही रक्कम क्रिकेटमधील आयपीएल आणि वर्ल्डकपच्या तुलनेत खूप जास्त आहे.

अल्कारेझला मिळाले २५ कोटी रुपये

विम्बल्डन २०२३ चा विजेता कार्लोस अल्कारेजला बक्षीस म्हणून २५ कोटी रुपये मिळाले आहेत. त्याचवेळी उपविजेता ठरलेल्या नोव्हाक जोकोविचला १२.२५ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

आयपीएल, क्रिकेट वर्ल्डकपची बक्षीस रक्कम

इंडियन प्रीमियर लीग 2023 मधील (IPL) विजेता संघ चेन्नई सुपर किंग्सला (CSK) एकूण २० कोटी रुपये मिळाले. ही रक्कम संपूर्ण संघामध्ये वितरित करण्यात आली. त्याचवेळी उपविजेत्या गुजरात टायटन्सला १३ कोटी रुपये देण्यात आले.

तर २०२२ मध्ये झालेल्या T20 विश्वचषकात इंग्लंडला विजेते म्हणून १३.०५ कोटी रुपये मिळाले होते, तर पाकिस्तानला उपविजेते म्हणून ६.५ कोटी रुपये देण्यात आले होते.

टेनिसमध्ये क्रिकेटपेक्षा जास्त बक्षीस रक्कम

विम्बल्डन व्यतिरिक्त, ३ इतर मोठ्या ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा वर्षात आयोजित केल्या जातात. यामध्येही बक्षिसाची रक्कम खपू जास्त आहे. गेल्या वर्षी यूएस ओपनमध्ये एकेरी स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूला २० कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले होते. याशिवाय, ऑस्ट्रेलियन ओपन 2023 मधील सिंगल इव्हेंटच्या विजेत्याला १६.७३ कोटी रुपयांपेक्षा जास्त तर फ्रेंच ओपन 2023 मधील सिंगल इव्हेंटच्या विजेत्याला २०.५८ कोटी रुपयांपेक्षा जास्त बक्षीस रक्कम देण्यात आली.

Whats_app_banner