- रविंद्र जाडेजा संघात राहाणार असला तरी कप्तान म्हणून चेन्नई संघ व्यवस्थापन नव्या नावाचा शोध घेत आहे. आता एक चांगला पर्याय चेन्नई संघासमोर उपलब्ध झाला आहे.
चेन्न्ई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे दोन आयपीएलमधले दादा संघ. मात्र आयपीएल २०२२ च्या हंगामात दोन्ही संघांना गळती लागली आणि किमान सामनेही न जिंकता या दोन्ही संघांनी सपशेल शरणागती पत्करली आहे. चेन्नईसमोर आता आणखी एक चिंता आवासुन उभी आहे ती म्हणजे चेन्नईचं नेतृत्व कोण करणार याची. महेंद्र सिंह धोनीकडून कप्तानी काढून घेत यंदा ती जबाबदारी रविंद्र जाडेजाकडे दिली गेली. मात्र मैदानावर पराक्रम गाजवणारा रविंद्र जाडेजा कप्तानीच्या डावपेचात सपशेल अपयशी ठरला. आठ सामने पराभव स्वीकार केल्यावर रविंद्र जाडेजाने तडकाफडकी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि अवघ्या आठ सामन्यातच पुन्हा एकदा धोनी चेन्नईचा कर्णधार झाला. मात्र धोनीचं वाढतं वय पाहाता तो फारकाळ खेळेल याची शाश्वती नसल्यानं आता चेन्नई संघ व्यवस्थापनानं नव्या पर्यायांचा विचार करु लागला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
अशातच चेन्नईकडे ब्राव्हो आणि मोईन अलीसारखे पर्याय उपलब्ध आहेत खरे मात्र ते किती काळ खेळतील हे सांगणं कठीण आहे. त्यामुळेच आता एक नवं नाव चेन्नई संघ व्यवस्थापनापुढे आलं आहे. ते नाव म्हणजे ऋतुराज गायकवाड.
ऋतुराज नव्या दमाचा आहे, ऋतुराजला चेन्नई संघानं रिटेनही केलंय. गेल्या हंगामात संधी मिळताच ऋतुराजनं संधीचं सोनं केलंय. कमी वय हा ऋतुराजच्या बाबतला सर्वात महत्वाचा मुद्दा. त्याशिवाय फलंदाज म्हणून ऋतुराजनं पाडलेली छाप त्याच्या पथ्यावर पडली आहे.ऋतुराजकडे नेतृत्व करण्याचाही अनुभव आहे. ऋतुराजने बीसीसीआयच्या स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे आणि नेतृत्व करताना त्याची फलंदाजी चांगलीच बहरलेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे ऋतुराजकडे जर संघाचे कर्णधारपद दिले तर संघाला आणि स्वत:लाही एका वेगळ्या उंचीवर नेऊ शकतो. त्यामुळे चेन्नईला जर भविष्याचा विचार करून कर्णधार निवडायचा असेल तर त्यांच्याकडे ऋतुराज गायकवाड हा सर्वोत्तम पर्याय असेल. मात्र संघ व्यवस्थापनाची अशी तयारी नसल्यास एका नव्या खेळाडूला संघात दाखल करुन त्याला कर्णधार करावं लागेल. ही स्थिती विरळा असल्याने सध्यातरी ऋतुराज संघाचं नेतृत्व करताना पाहायला मिळू शकतो.