Who Is Swapnil Kusale : आई सरपंच, वडील शिक्षक तर धोनीला आदर्श मानतो, स्वप्नील कुसळे आहे तरी कोण? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Who Is Swapnil Kusale : आई सरपंच, वडील शिक्षक तर धोनीला आदर्श मानतो, स्वप्नील कुसळे आहे तरी कोण? जाणून घ्या

Who Is Swapnil Kusale : आई सरपंच, वडील शिक्षक तर धोनीला आदर्श मानतो, स्वप्नील कुसळे आहे तरी कोण? जाणून घ्या

Aug 01, 2024 08:44 PM IST

भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात प्रथमच नेमबाजांनी नेमबाजीत तीन पदके जिंकली आहेत.

Who Is Swapnil Kusale : आई सरपंच, वडील शिक्षक तर धोनीला आदर्श मानतो, स्वप्नील कुसळे आहे तरी कोण? जाणून घ्या
Who Is Swapnil Kusale : आई सरपंच, वडील शिक्षक तर धोनीला आदर्श मानतो, स्वप्नील कुसळे आहे तरी कोण? जाणून घ्या (EPA-EFE)

भारताच्या स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये भारताला पहिले कांस्यपदक मिळवून दिले. पात्रता फेरीत सातव्या स्थानावर असलेल्या स्वप्नीलने ८ नेमबाजांच्या अंतिम फेरीत ४५१.४ गुण मिळवत तिसरे स्थान पटकावले.

या खेळांमधील भारताचे हे तिसरे कांस्यपदक आहे. यापूर्वी मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल आणि १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक गटात सरबज्योत सिंगसह कांस्यपदक जिंकले होते.

भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात प्रथमच नेमबाजांनी नेमबाजीत तीन पदके जिंकली आहेत.

चीनच्या लिऊ युकुन (४६३.६) याने सुवर्णपदक तर युक्रेनच्या सेर्ही कुलिशने (४६१.३) रौप्यपदक जिंकले.

याआधी लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज जॉयदीप कर्माकर ५० मीटर रायफलमध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता, पण तेव्हा तो ५० मीटर रायफल प्रोनमध्ये चौथ्या स्थानावर राहिला. आता तो इव्हेंट ऑलिम्पिकचा भाग नाही.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावचा रहिवासी असलेला स्वप्नील कुसळे एम एस धोनीला आपला आदर्श मानतो. स्वप्नील देखील रेल्वेत टीसी आहे.

विशेश म्हणजे, फायनलमध्ये स्वप्नील कुसळे पहिल्या स्टँडिंग सीरीजनंतर चौथ्या स्थानावर होता. यानंतर नीलिंगमध्ये त्याचा पहिला शॉट ९.६ असा होता पण नंतर त्याने शानदार पुनरागमन केले. यानंतर, तो १०.६ आणि १०.३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला, परंतु पुढील दोन शॉट्स ९.१ आणि १०.१ असे होते, ज्यामुळे तो चौथ्या स्थानावर घसरला.

स्वप्नीलने दमदार पुनरागमन करत चमत्कार घडवला

त्यानंतर १०.३ गुण मिळवून तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला आणि शेवटपर्यंत कायम राहिला. नीलिंग पोजिशननंतर तो सहाव्या स्थानावर होता पण प्रोननंतर तो पाचव्या स्थानावर आला.

गेल्या १२ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या कुसळेला ऑलिम्पिक पदार्पणासाठी तब्बल १२ वर्षे वाट पाहावी लागली. धोनीइतकाच 'कूल' असलेल्या कुसळेने क्रिकेट विश्वचषक विजेत्या कर्णधारावर आधारित चित्रपट अनेकदा पाहिल्याचे सांगितले.

वडील आणि भाऊ शिक्षक, आई गावची सरपंच

ऑलिम्पिकसाठी पात्र झाल्यानंतर तो म्हणाला होता, की 'मी नेमबाजीत कोणत्याही विशिष्ट खेळाडूचे मार्गदर्शन घेत नाही. पण इतर खेळांमध्ये धोनी माझा फेव्हरेट आहे. माझ्या खेळात शांत राहण्याची गरज आहे आणि तोही मैदानावर नेहमी शांत असायचा. तोदेखील एके काळी टीसी होता आणि मी सुद्धा.'

स्वप्नील कुसळे २०१५ पासून मध्य रेल्वेत कार्यरत आहे. त्याचे वडील आणि भाऊ जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत आणि आई गावची सरपंच आहे. त्याच्या कामगिरीबद्दल तो म्हणाला, 'आतापर्यंतचा अनुभव खूप चांगला आहे. मला शूटिंग आवडते आणि मला खूप आनंद आहे की मी इतके दिवस ते करू शकलो. मनू भाकर यांना पाहिल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला आहे. ती जिंकू शकते तर आपणही जिंकू शकतो.

Whats_app_banner

संबंधित बातम्या