Sarabjot Singh : फुटबॉलपटू व्हायचे होते, पण अपघातानं नेमबाजीत आला! चित्रपटाला शोभेल अशी सरबज्योतची स्टोरी
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sarabjot Singh : फुटबॉलपटू व्हायचे होते, पण अपघातानं नेमबाजीत आला! चित्रपटाला शोभेल अशी सरबज्योतची स्टोरी

Sarabjot Singh : फुटबॉलपटू व्हायचे होते, पण अपघातानं नेमबाजीत आला! चित्रपटाला शोभेल अशी सरबज्योतची स्टोरी

Jul 30, 2024 04:08 PM IST

सरबजोत सिंग हा हरियाणातील अंबाला जिल्ह्यातील देहान गावचा रहिवासी आहे. त्यांचा जन्म ३० सप्टेंबर २००१ रोजी झाला. त्याचे वडील जतिंदर सिंग हे शेतकरी आहेत आणि आई हरदीप कौर गृहिणी आहेत.

Sarabjot Singh Profile : फुटबॉलपटू व्हायचे होते, पण नाटकियरित्या नेमबाजीत आला, चित्रपटाला शोभेल अशी सरबज्योतची स्टोरी, वाचा
Sarabjot Singh Profile : फुटबॉलपटू व्हायचे होते, पण नाटकियरित्या नेमबाजीत आला, चित्रपटाला शोभेल अशी सरबज्योतची स्टोरी, वाचा

भारतीय नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. भारतीय नेमबाजांनी कोरियन जोडीला हरवून कांस्यपदक जिंकले. अशा प्रकारे भारताला दुसरे पदक मिळाले. सरबजोत सिंगचे हे पहिलेच ऑलिम्पिक पदक आहे.

याआधी रविवारी मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकले होते. मनू भाकर ऑलिम्पिकमधील १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. याशिवाय एकाच ऑलिम्पिकमध्ये २ पदके जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली आहे.

सरबज्योत सिंग हा हरियाणाचा रहिवासी

सरबजीत सिंग हा हरियाणातील अंबाला जिल्ह्यातील देहान गावचा रहिवासी आहे. त्यांचा जन्म ३० सप्टेंबर २००१ रोजी झाला. त्याचे वडील जतिंदर सिंग हे शेतकरी आहेत आणि आई हरदीप कौर गृहिणी आहेत. त्याने चंदीगड येथील सेक्टर १० येथील डीएव्ही कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. २०२३ मध्ये, त्यांने पंजाब विद्यापीठातून कला विषयात पदवी प्राप्त केली.

फुटबॉलपटू व्हायचे होते

सरबज्योतने सेंट्रल फिनिक्स क्लबमध्ये असलेल्या अंबाला कॅंटमधील एआर शूटिंग अकादमीमध्ये प्रशिक्षक अभिषेक राणा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले.

सरबजोतला सुरुवातीला फुटबॉलपटू व्हायचे होते, पण समर कॅम्पदरम्यान त्याची आवड नाटकीयरित्या बदलली, जेव्हा त्याने पिस्तुलने पेपर टार्गेटवर निशाणा साधला. या अनुभवाचा त्याच्या मनावर मोठा प्रभाव पडला आणि त्याने नेमबाजीचा मार्ग स्वीकारला.

सरबज्योत सिंगच्या नावावर १३ पदके

सरबज्योत सिंगने ज्युनियर वर्ल्ड कप २०१९ मध्ये पहिल्यांदा ३ पदके जिंकली होती. ज्यामध्ये दोन रौप्य आणि एका सुवर्ण पदकाचा समावेश आहे. यानंतर सरबज्योत सिंग आजतागायत थांबला नाही. आज सरबज्योत सिंगच्या खात्यात १३ पदके आहेत. ज्यामध्ये ७ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश आहे.

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये, सरबज्योत सिंगने मनू भाकरसह मिश्र १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकण्यात यश मिळविले.

एशियन गेम्स

आशियाई क्रीडा २०२२ मध्ये सरबज्योत सिंगने एका रौप्यपदकासह दोन सुवर्णपदके जिंकण्यात यश मिळविले. त्याने १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक आणि १० मीटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर मिश्र 10 मीटर एअर पिस्तुलमध्ये रौप्यपदक जिंकण्यात यश मिळवले.

विश्वचषक २०२३

सरबज्योत सिंगने २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली होती. १० मीटर एअर पिस्तूल पुरुष आणि १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात त्याने हे पदक जिंकले.

आशियाई चॅम्पियनशिप

सरबज्योत सिंगने आशियाई चॅम्पियनशिप २०२३ मध्ये १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकले. त्याच वेळी, आशियाई चॅम्पियनशिप २०१९ मध्ये, त्याने एक कांस्य आणि एक सुवर्ण पदक जिंकले. त्याने हे पदक १० मीटर एअर पिस्तूल पुरुष सांघिक आणि मिश्र १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत जिंकले.

जागतिक अजिंक्यपद

सरबज्योत सिंगने वर्ल्ड चॅम्पियनशिप २०१९ मध्ये १० मीटर एअर पिस्तूल ज्युनियर पुरुषांच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळविले.

ज्युनियर वर्ल्ड कप २०१९

ज्युनियर वर्ल्ड कप २०१९ मध्ये सरबज्योत सिंगने दोन रौप्य आणि एक सुवर्णपदक जिंकले. या दोघांनी १० मीटर एअर पिस्तूल पुरुषांच्या वैयक्तिक आणि मिश्र १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात रौप्य पदक जिंकले. याशिवाय सरबज्योत सिंगने १० मीटर एअर पिस्तूल संघात सुवर्णपदक पटकावले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या