केजची कन्या भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवणार? खो-खो संघाची कर्णधार प्रियांका इंगळे कोण आहे? पाहा
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  केजची कन्या भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवणार? खो-खो संघाची कर्णधार प्रियांका इंगळे कोण आहे? पाहा

केजची कन्या भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवणार? खो-खो संघाची कर्णधार प्रियांका इंगळे कोण आहे? पाहा

Published Jan 17, 2025 07:23 PM IST

Who Is Priyanka Ingle : भारतात सध्या खो-खो वर्ल्डकप खेळला जात आहे. या स्पर्धेत केजची प्रियांका इंगळे ही भारताचे नेतृत्व करत आहे.

केजची कन्या भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवणार? खो-खो संघाची कर्णधार प्रियांका इंगळे आहे? पाहा
केजची कन्या भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवणार? खो-खो संघाची कर्णधार प्रियांका इंगळे आहे? पाहा

Who Is Priyanka Ingle Kho Kho India Cpatain : प्रियांका इंगळे हे नाव सध्या प्रचंड चर्चेत आहे. कारण भारताच्या महिला संघाला खो खोचा वर्ल्ड चॅम्पियन बनवण्याची सर्व जबाबदारी तिच्या खांद्यावर आहे. १३ जानेवारीपासून भारतात पुरुष आणि महिलांचा खो खो विश्वचषक खेळवला जात आहे.

या स्पर्धेत भारतीय महिला संघाने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारत अ गटात असून संघाने गट फेरीतील सर्वच सामने जिंकून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. या खो-खोच्या वर्ल्डकपमध्ये मराठमोळी प्रियांका इंगळे ही टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. प्रियांका इंगळे आयकर विभागात नोकरी करते. 

भारतीय महिला खो खो संघाचे नेतृत्व करणारी प्रियांका इंगळे ही बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कळंमआंबा गावची आहे. पण ती पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये लहानाची मोठी झाली.

प्रियंकाचा जन्म २०० मध्ये झाला. पिंपरी चिंचवडच्या वडमुख वाडीमधील श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयात प्रियंकाचे शिक्षण झाले. येथेच तिला खो-खो खेळात करिअर करण्याचा मार्गही सापडला. 

पाचवीपासून खो-खो खेळायला सुरुवात

प्रियांका इंगळे हिने पाचव्या वर्गात असल्यापासून खो-खो खेळायला सुरुवात केली आणि तेव्हापासून ती गेली १५ वर्षे हा खेळ अतिशय उत्कटतेने खेळत आहे. प्रियांका ही अतिशय नम्र कौटुंबिक पार्श्वभूमीतून आली आहे, तिचे पालक त्यांच्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहेत.

प्रियांका इंगळे ही वयाच्या १२ व्या वर्षीपासून राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहे. सातवीत असताना प्रियंकाने तिच्या कारकिर्दीतील पहिली राष्ट्रीय स्पर्धा खेळली. 

आतापर्यंत २३ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला

२०२३ मध्ये चौथ्या आशियाई खो-खो स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले होते. यापूर्वी तिला २०२२ मध्ये राष्ट्रीय स्तरावर राणी लक्ष्मीबाई पुरस्कारही मिळाला आहे. तिने आपल्या १५ वर्षांच्या खो खो कारकिर्दीत २३ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.

खो खो खेळण्यासोबतच प्रियांका इंगळे नोकरीही करते. तिने पुण्यातूनच एम.कॉम. केले आहे. आता ती मुंबईत आयकर विभागात कर सहाय्यक म्हणून काम करते. या पदासाठी दरमहा ग्रेडनुसार पगार दिला जातो. यात दरमहा २५५०० ते ८१,००० रुपये वेतन दिले जाते. प्रियांकाला नुकतीच महाराष्ट्र सरकारने क्रीडा विभागात ग्रेड २ ची नोकरी ऑफर केली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग