सुवर्णपदक देऊन टाका… कोण आहे ही सुंदर तिरंदाज, जिच्या नजरेने संपूर्ण सोशल मीडिया घायाळ झाला, पाहा-who is chou tzuyu getting viral amid paris olympics 2024 all you need to know ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  सुवर्णपदक देऊन टाका… कोण आहे ही सुंदर तिरंदाज, जिच्या नजरेने संपूर्ण सोशल मीडिया घायाळ झाला, पाहा

सुवर्णपदक देऊन टाका… कोण आहे ही सुंदर तिरंदाज, जिच्या नजरेने संपूर्ण सोशल मीडिया घायाळ झाला, पाहा

Aug 08, 2024 05:03 PM IST

व्हायरल मुलीचने नाव चोऊ त्ज़ुयू (Chou Tzuyu) आहे आणि तुम्हाला तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ती एक ॲथलीट नाही तर एक गायक आणि डान्सर आहे. चोऊ त्ज़ुयू दक्षिण कोरियन गर्ल ग्रुप TWICE ची सदस्य आहे.

Chou Tzuyu : सुवर्णपदक देऊन टाका… कोण आहे  ही सुंदर तिरंदाज, जिच्या नजरेने संपूर्ण सोशल मीडिया घायाळ झाला
Chou Tzuyu : सुवर्णपदक देऊन टाका… कोण आहे ही सुंदर तिरंदाज, जिच्या नजरेने संपूर्ण सोशल मीडिया घायाळ झाला

पॅरिस ऑलिम्पिक२०२४ दरम्यान एका सुंदर मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ही सुंदर मुलगी तिरंदाजी करताना दिसत आहे. ही मुलगी तिच्या आकर्षक स्टाइलने नेम धरताना दिसत आहे. या मिस्ट्री गर्लने तिच्या स्टाईलने आणि सौंदर्याने सर्वांना वेड लावत आहे.

बॉलिवूड अभिनेता-निर्माता केआरके म्हणजेच कमल आर. खान हा या मुलीला पाहून इतका प्रभावित झाला, की त्याने तिला न खेळवताच सुवर्णपदक द्यायला हवे असे म्हटले आहे.

चला तर मग जाणून घेऊया की, ही सुंदर मुलगी कोण आहे आणि तिचा धनुर्विद्याशी काही संबंध आहे का?

खरं तर, या व्हायरल मुलीचने नाव चोऊ त्ज़ुयू (Chou Tzuyu) आहे आणि तुम्हाला तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ती एक ॲथलीट नाही तर एक गायक आणि डान्सर आहे. चोऊ त्ज़ुयू दक्षिण कोरियन गर्ल ग्रुप TWICE ची सदस्य आहे.

बॉलीवूड चित्रपट निर्माता कमाल राशिद खान याने ट्विटरवर तिचा व्हिडिओ ट्विट करत लिहिले आहे की, 'न खेळवताच चोऊ त्ज़ुयू हिला सुवर्णपदक द्या".

चोऊ त्ज़ुयू तैवानमध्ये जन्मली

चोऊ त्ज़ुयू हिचा जन्म १४ जून १९९९ ला तैवान येथे झाला. चोऊ त्ज़ुयू ही एका सधन कुटुंबात वाढली. तिने लहानपणापासूनच तिच्या कलात्मक कौशल्यांना प्रोत्साहन दिले. विविध शालेय कार्यक्रम आणि स्थानिक स्पर्धांमध्ये भाग घेतला. तिचे पालक तैवानमध्ये यशस्वी व्यवसाय चालवतात, ज्यामुळे तिला कोणत्याही आर्थिक समस्यांशिवाय तिच्या स्वप्नांना दिशा देता आली.

जेवायपी एंटरटेनमेंट स्काउट्सने पहिल्यांदा पाहिले

चोऊ त्ज़ुयू हिला २०१२ मध्ये सर्वप्रथम जेवायपी एंटरटेनमेंट स्काउट्सने एका म्यूझिक कार्यक्रमात पाहिले. तिची क्षमता ओळखून त्यांनी चोऊला त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण कोरियाला नेले. परदेशात राहण्याची आणि नवीन भाषा शिकण्याची आव्हाने असतानाही चोऊ त्जुयू हिने गायन, नृत्य आणि अभिनय यातील स्किल पटकन सुधारले.

रिअ‍ॅलिटी शोमधून लोकप्रियता मिळाली

यानंतर चोऊ त्ज़ुयू २०१५ मध्ये पहिल्यांदा प्रसिद्धी झोतात आली. जेव्हा तिने रिॲलिटी सर्व्हायव्हल शो 'Sixteen' मध्ये भाग घेतला. हा शो जेवायपी एंटरटेनमेंटच्या नवीन मुलींचा ग्रुप निवडण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या शोमध्ये चोऊला तिची प्रतिभा, कठोर परिश्रम आणि मोहक व्यक्तिमत्त्वामुळे फायनलमध्ये स्थान मिळाले. यानंतर ती ऑफिशियली TWICE या गर्ल ग्रुपचा भाग बनली.