पाकिस्तानच्या अर्शद नदीम याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. पॅरिसमधील स्टेड डी फ्रान्स येथे गुरुवारी झालेल्या अंतिम सामन्यात त्याने ९२.९७ मीटरचा विक्रमी थ्रो फेकला, त्यामुळे भारताच्या नीरज चोप्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
पाकिस्तानसाठी हा विजय ऐतिहासिक क्षण आहे, कारण ऑलिम्पिकमधील त्यांचे वैयक्तिक सुवर्ण आहे. यापूर्वी पाकिस्तानने केवळ हॉकीमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.
२७ वर्षीय अर्शद नदीमची अंतिम फेरीत सुरुवात खास नव्हती. पहिल्या थ्रोदरम्यान त्याचा रनअप नीट बसला नाही. यामुळे त्याने फाऊल केला. मात्र दुसऱ्या प्रयत्नात नदीमने ऑलिम्पिकचा विक्रम मोडला. नदीमची थ्रो ९२.९७ मीटर लांब भाला फेकला. येथेच त्याचे सुवर्णपदक जवळपास निश्चित झाले होते.
अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत ९० मीटरपेक्षा जास्त अंतराचे दोन थ्रो फेकले. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानेही ८९.४५ मीटर फेक करून मोमसातील त्याची सर्वोत्तम कामगिरी केली.
अर्शद नदीमच्या या विजयामुळे तो रातोरात स्टार झाला आहे. नदीमचा जन्म २ जानेवारी १९९७ रोजी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मियां चन्नू शहराजवळील एका छोट्या गावात झाला. हे लाहोरपासून सुमारे ३०० किलोमीटर अंतरावर आहे.
अर्शद हा ७ भावंडांमध्ये तिसरा आहे. त्याचे वडील मोहम्मद अश्रफ हे निवृत्त बांधकाम कामगार आहेत. क्रिकेट हे अर्शद नदीमचे पहिले प्रेम होते, परंतु त्याच्या कुटुंबीयांनी त्याला हा खेळ खेळण्यास मनाई केली होती. पुढे त्याने ॲथलेटिक्समध्ये हात आजमावला आणि भालाफेक हा आपले प्रोफेशन बनवले.
सुवर्ण पदक - २०२४ ऑलिंपिक खेळ
रौप्य पदक - २०२३ वर्ल्ड चॅम्पियनशिप
सुवर्ण पदक - २०२२ राष्ट्रकुल खेळ
अर्शद नदीमची प्रतिभा सुधारण्यात त्याचे प्रशिक्षक फैसल अहमद यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. फैसल अहमद यांनी सुरुवातीपासूनच अर्शद नदीमला प्रशिक्षण देऊन त्याला जागतिक दर्जाचा खेळाडू बनवले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान नदीमने प्रथमच ९० मीटरचा टप्पा ओलांडला होता. ९० मीटर भाला फेक करणारा तो अजूनही एकमेव दक्षिण आशियाई खेळाडू आहे.