Paris Olympics 2024 : नेमबाजांना बंदुका कशा मिळतात? किंमत किती? गोळ्या किती ठेवता येतात, सर्वकाही जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Paris Olympics 2024 : नेमबाजांना बंदुका कशा मिळतात? किंमत किती? गोळ्या किती ठेवता येतात, सर्वकाही जाणून घ्या

Paris Olympics 2024 : नेमबाजांना बंदुका कशा मिळतात? किंमत किती? गोळ्या किती ठेवता येतात, सर्वकाही जाणून घ्या

Jul 29, 2024 08:17 PM IST

गेल्या दोन दशकांत भारतीय नेमबाजांनी जगभरात झेंडा फडकवला आहे, त्यामुळे या खेळाडूंच्या बंदुका खऱ्या आहेत का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडणे स्वाभाविक आहे. बंदूक खरी असेल तर त्यांना परवाना कोण देतो? तो कसा मिळतो? असेही प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

Paris Olympics 2024 : नेमबाजांना बंदुका कशा मिळतात? किंमत किती? गोळ्या किती ठेवता येतात, सर्वकाही जाणून घ्या
Paris Olympics 2024 : नेमबाजांना बंदुका कशा मिळतात? किंमत किती? गोळ्या किती ठेवता येतात, सर्वकाही जाणून घ्या (OlympicKhel - X)

भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने परिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई करून इतिहास रचला. या ऐतिहासिक यशानंतर मनू भाकर चांगलीच चर्चेत आली आहे. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिच्या बंदुकीत तांत्रिक बिघाड झाला होता. पण यंदा म्हणजेच २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिने भारताला पहिले पदक मिळवून देऊन इतिहास रचला. 

गेल्या दोन दशकांत भारतीय नेमबाजांनी जगभरात झेंडा फडकवला आहे, त्यामुळे या खेळाडूंच्या बंदुका खऱ्या आहेत का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडणे स्वाभाविक आहे. बंदूक खरी असेल तर त्यांना परवाना कोण देतो? तो कसा मिळतो? असेही प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. चला तर मग जाणून घेऊया ऑलिम्पिकमध्ये वापरल्या जाणाऱ्या बंदुकीची खासियत काय आहे?

खेळाडूंना बंदूक कुठून आणि कशी मिळते?

साधारणपणे, ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या देशाच्या राष्ट्रीय ऑलिम्पिक समिती किंवा राष्ट्रीय महासंघाकडून बंदुका पुरवल्या जातात. म्हणजे, जर एखादा भारतीय खेळाडू ऑलिम्पिक किंवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाला, तर नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) किंवा इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) त्याला बंदूक प्रदान करेल. पण काही वेळा खेळाडूंना त्यांच्या आवडीच्या बंदुकीने खेळायला आवडते, तर कधी खेळाडूंचे स्पॉन्सरही त्यांना बंदुका प्रदान देतात.

खेळाडूंना परवाना कसा मिळतो?

ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या नेमबाजांनाही परवाना घ्यावा लागतो. ब्रिटिश सरकारने १८७८ मध्ये आणलेल्या शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत खेळाडूंना परवाना घ्यावा लागतो. यामुळे भारतातील कोणताही नागरिक सरकारच्या परवानगीशिवाय बंदूक खरेदी किंवा विकू शकत नाही. पण ॲथलीट्सना सामान्य लोकांपेक्षा बंदुका विकत घेण्याची अधिक सूट मिळते.

खेळाडू किती बंदुक आणि गोळ्या खरेदी करू शकतात?

नियमांनुसार, लोकप्रिय शूटरला त्याच्यासोबत १२ बंदुका ठेवण्याची परवानगी आहे. पण काही नेमबाजी खेळाडूंना ८-१० बंदुका ठेवण्याची परवानगी आहे. बुलेटबद्दल बोलायचे तर हे खेळाडू .२२ एलआर रायफल किंवा पिस्तुलसाठी ५ हजार बुलेट ठेवू शकतात. दुसरीकडे, पिस्तूल/रिव्हॉल्व्हरसाठी २ हजार गोळ्या ठेवण्याची परवानगी आहे.

बंदुकीची किंमत किती आहे?

मनू भाकरने २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले ती बंदूक मोरीनी कंपनीची आहे. मोरीनी कंपनीच्या CM 162EI मॉडेलची बाजारात किंमत १६६,९०० रुपये आहे. ही .१७७ एअर गन आहे, ज्याची किंमत कंपनीनुसार कमी-अधिक असू शकते. ही बंदूक खरेदी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे खूपच किचकट आहेत.

Whats_app_banner