मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Umran Malik Video: उमरान आग ओकतोय! बांगलादेशी फलंदाजांना चेंडू दिसेना, शांतो-शकिब हैराण

Umran Malik Video: उमरान आग ओकतोय! बांगलादेशी फलंदाजांना चेंडू दिसेना, शांतो-शकिब हैराण

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 07, 2022 03:22 PM IST

Umran Malik bowling, India Vs Bangladesh 2nd Odiभारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा सामना आज ढाका येथे खेळला जात आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज उमरान मलिकने आपल्या वेगाने खळबळ उडवून दिली आहे. उमरानच्या वेगाने बांगलादेशी फलंदाज हैराण झाले आहेत.

Umran Malik bowling
Umran Malik bowling

भारत आणि बांगलादेश यांच्यात एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना ढाक येथे खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय त्यांच्यासाठी चुकीचा ठरला. कारण टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली आणि यजमान संघाला बॅकफूटवर ढकलले आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज उमरान मलिकने आपल्या वेगवान गोलंदाजी सर्वांना आश्चर्यचा धक्का दिला आहे. त्याचे चेंडू बांगलादेशच्या फलंदाजांच्या आवाक्याबाहेर असल्याचे दिसून येत आहे.

उमरानने या सामन्यात शाकिब अल हसनला आपले लक्ष्य केले. उमरानचे पहिले षटक शकीब अल हसनसाठी खूपच घातक ठरले. या षटकात दोनदा चेंडू शकिबला लागला. बांगलादेशच्या डावातील १२वे षटक उमरान मलिकने टाकले, या षटकात त्याने सहाही चेंडू १४५ हून अधिक वेगाने टाकले. या षटकातातील एक चेंडू शकीबच्या कमरेला लागला. यानंतर तपासणी करण्यासाठी फिजिओला मैदानात यावे लागले. याशिवाय ओव्हरचा शेवटचा चेंडू शकीब अल हसनच्या हेल्मेटवर बसला, त्यानंतर पुन्हा एकदा मैदानावर फिजीओंची एन्ट्री झाली.

उमरानचे हे षटक अप्रतिम होते, या षटकात शाकिब अल हसन फक्त टिकून होता. शेवटी वॉशिंग्टन सुंदरने शकिबला आपली शिकार बनवले. शाकिबने २० चेंडूत केवळ ८ धावा केल्या.

त्यानंतर उमरान मलिकने दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नजमुल हसन शांतोला बाद केले. या चेंडूचा वेग ताशी १५१ किमी होता. शांतोला चेंडू दिसलाही नाही. त्याला काही कळण्याच्या आतच स्टम्प्स विकेटकीपर केएल राहुलजवळ जावून पडले होते.

WhatsApp channel