पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने एकूण ६ पदके जिंकली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक महिला नेमबाज मनू भाकर हिने मिळवून दिले. स्पर्धेत भारताने एकूण ५ कांस्यपदके जिंकली, तर १ रौप्यपदक जिंकले.
गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. आता पॅरिस ऑलिम्पिक संपले आहे. या दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नीरज चोप्रा आणि मनू भाकर हिची आई सुमेधा भाकर यांचा आहे. व्हिडीओत मनू भाकरची आई नीरज चोप्रासोबत काही तरी बोलताना दिसत आहे. या संवादावर चाहत्यांनी रंजक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मनू भाकरची आई सुमेधा भाकर भालाफेकपटू नीरज चोप्राशी चर्चा करत आहे आणि यादरम्यान ती नीरजच्या डोक्यावर हात ठेवते. नेमका हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि याबाबत नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.
नीरज चोप्राने मनूच्या आईसोबत केलेल्या संवादाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका युजरने लिहिले, “रिलेशनशिप कन्फर्म झाले.”
तर दुसऱ्या युजरने लिहिले की, "सिधा रिश्ताही कर दिया क्या इसका."
आणखी एका युजरने अशाच विनोदी पद्धतीने लिहिले की, बेटा तू किती हुंडा घेणार? त्याचप्रमाणे इतर युजर्सनीही व्हिडिओवर वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदकं जिंकले. मनूने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात पहिले पदक जिंकले. त्यानंतर १० मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र सांघिक स्पर्धेत तिने सरबज्योत सिंगसह कांस्यपदक जिंकले. यासह, एका ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू भाकर ही भारताची पहिली खेळाडू ठरली.