IPL 2022: लिव्हिंगस्टोनला पाहून वसीम जाफरला बाबा राम रहीमची आठवण
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2022: लिव्हिंगस्टोनला पाहून वसीम जाफरला बाबा राम रहीमची आठवण

IPL 2022: लिव्हिंगस्टोनला पाहून वसीम जाफरला बाबा राम रहीमची आठवण

Updated May 17, 2022 01:44 PM IST

व्हिडिओत “लेग स्पिन,ऑफ स्पिन,विकेटकीपिंग आणि फिल्डिंग आपण सर्व करू शकतो, आपण संपूर्ण ऑलराऊंडर आहोत”, असे म्हणताना दिसत आहे.

<p>लियम लिव्हिंगस्टोन आणि बाबा गुरमित राम रहिम</p>
<p>लियम लिव्हिंगस्टोन आणि बाबा गुरमित राम रहिम</p>

आयपीएलम २०२२ मध्ये किंग्स पंजाबच्या लियम लिविंगस्टोनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चांगली गोलंदाजी केली. त्याने अवघ्या २७ धावा देत ३ महत्वाचे फलंदाज तंबूत पाठवले. लिविंगस्टोनची गोलंदाजीतील कामगिरी पाहून भारताचा माजी कसोटीपटू वसीम जाफर चांगलाच प्रभावित झाला.

जाफरने सोशम मीडियावर मीम स्वरुपात एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ बाबा गुरमित राम रहिमचा असून ज्यामध्ये तो“लेग स्पिन,ऑफ स्पिन,विकेटकीपिंग आणि फिल्डिंग आपण सर्व करू शकतो, आपण संपूर्ण ऑलराऊंडर”, असल्याचे म्हणताना दिसत आहे. हे मीम आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. माजी क्रिकेटर वसीम जाफर असे अनेक मजेशीर मीम शेअर करताना व सोशल मीडियावर अनेक खेळाडूंची मजा मस्करी करताना दिसतो.

दरम्यान, या महत्वाच्या सामन्यात पंजाब किंग्सला दिल्ली कॅपिटल्सकडून १७ धावांनी मात खावी लागली. प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता. या पराभवानंतरपंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल आपल्या फलंदाजांवर चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. सामन्यात कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना १५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरापंजाबचे किंग्स २० षटकात केवळ १४२ धावांपर्यंतच मजल मारू शकले. हाविजय मिळवून दिल्लीने अंकतालिकेत चौथे स्थान मिळवले आहे. तर या पराभवामुळे पंजाबचा संघ जवळपास स्पर्धेबाहेर झाला आहे.

तसेच, सध्या प्ले ऑफमधील उर्वरित तीन जागांसाठी सात संघांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. तर अजून सहा लीग सामने अद्याप खेळायचे आहेत. गुजरातपाठोपाठ राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचे प्लेऑफमधले स्थान जवळपास निश्चित आहे. राजस्थानचा संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या तर लखनौचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग