मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Washington Sundar Catch : वॉशिंग्टनचा हा ‘सुंदर’ झेल बघितला का? व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल वाह!

Washington Sundar Catch : वॉशिंग्टनचा हा ‘सुंदर’ झेल बघितला का? व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल वाह!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 27, 2023 09:24 PM IST

washington sundar catch video : वॉशिंग्टन सुंदरने रांची टी-20 सामन्यात अप्रतिम झेल घेऊन (Ind vs NZ Washington Sundar Catch) सर्वांना आश्चर्यचकित केले. पॉवरप्लेमध्ये त्याने दोन महत्वाचे बळीही घेतले.

Washington Sundar Catch IND VS NZ T20
Washington Sundar Catch IND VS NZ T20

washington sundar tookes mark chapman catch video : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना रांची येथे खेळवला जात आहे. या सामन्यासाठी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी वॉशिंग्टन सुंदरने एक अप्रतिम झेल घेत सर्वांनाच चकित केले. सुंदरच्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून चाहत्यांना तो खूप आवडला आहे. सुंदरने पॉवरप्लेमध्ये २ महत्वपूर्ण बळी घेतले. त्यामुळे टीम इंडियाचे सामन्यात पुनरागमन सोपे झाले.

खरे तर न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. यादरम्यान फिन अॅलन आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी वेगवान सुरुवात केली. फिन एलन-कॉनवने जोडीने अवघ्या ४ षटकात ४३ धावा फटकावल्या होत्या. मात्र, पाचव्या षटकात खेळ बदलला. हे षटक फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरने टाकले. सुंदरने या षटकात दोन फलंदाज तंबूत पाठवले. त्याने आधी एलनला बाद केले. त्यानंतर आलेल्या मार्क चॅपमनला शुन्यावर बाद केले. एलनने २३ चेंडूत ३५ धावा केल्या. त्याने ४ चौकार आणि एक षटकार ठोकला.

सुंदरने चॅपमनचा स्वताच्याच गोलंदाजीवर अप्रतिम झेल घेतला. चॅपमनने ढकललेला चेंडू सुंदरने हवेत झेप घेत टिपला. बीसीसीआयने सुंदरच्या झेलचा व्हिडिओ ट्विट केला आहे. चाहत्यांना तो खूप आवडला आहे. ट्विटरवर अल्पावधीतच हजारो लोकांनी व्हिडीओला लाईक केले आहे. त्याचबरोबर अनेक चाहत्यांनीही आपल्या कमेंट्स केल्या आहेत.

विशेष म्हणजे, सुंदरने रांची टी-20 मध्ये शानदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात केवळ २२ धावा देत २ बळी घेतले. सुंदरच्या या कामगिरीमुळे टीम इंडियाने न्यूझीलंडला १७७ धावांवर रोखले.

WhatsApp channel