मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virender Sehwag Son: वीरेंद्र सेहवागच्या मुलाची प्रोफेशनल क्रिकेटमध्ये एन्ट्री, 'या' संघात झाली निवड

Virender Sehwag Son: वीरेंद्र सेहवागच्या मुलाची प्रोफेशनल क्रिकेटमध्ये एन्ट्री, 'या' संघात झाली निवड

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 06, 2022 05:11 PM IST

Aryaveer Sehwag, Virender Sehwag Son: टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागला दिल्ली संघात संधी मिळाली आहे. अंडर १६ विजय मर्चंट ट्रॉफी स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.

Aryaveer Sehwag
Aryaveer Sehwag

वीरेंद्र सेहवागच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सेहवागच्या मुलाने आता प्रोफेशनल क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले आहे.वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागची बीसीसीआयने आयोजित केलेल्या अंडर-१६ विजय मर्चंट ट्रॉफीसाठी दिल्ली संघात निवड झाली आहे. १५ वर्षांचा आर्यवीर आता आपल्या वडिलांप्रमाणेच क्रिकेट विश्वात थैमान घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

दिल्लीचा संघ सध्या बिहारविरुद्ध सामना खेळत आहे. मात्र या सामन्यात आर्यवीरला प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळालेले नाही. पण त्याची एंट्री आता मोठ्या स्तरावर झाली आहे. अशा प्रकारे चाहत्यांना पुन्हा एकदा मैदानावर वीरेंद्र सेहवागची झलक पाहायला मिळू शकते.

अंडर-१६ विजय मर्चंट ट्रॉफीसाठी दिल्ली संघ:

अर्णव बग्गा (कर्णधार), सार्थक रे, प्रणव, सचिन, अनिंदो, श्रेय सेठी (विकेटकीपर), प्रियांशू, लक्ष्मण, उद्धव मोहन, ध्रुव, किरीट कौशिक, नैतिक माथूर, शंतनू यादव, मोहक कुमार, आर्यवीर सेहवाग

दरम्यान, आर्यवीर सेहवागच्या इंस्टाग्रामवर त्याच्या फलंदाजीचे अनेक व्हिडिओ आहेत. यामध्ये तो त्याचे वडील वीरेंद्र सेहवागप्रमाणेच स्टान्स घेताना दिसत आहे. तसेच. वीरूप्रमाणेच नेटमध्ये गोलंदाजांची धुलाई करताना दिसत आहे.

वीरेंद्र सेहवागचे क्रिकेट करिअर

वीरेंद्र सेहवागच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर, तो केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात धोकादायक फलंदाजांमध्ये गणला जातो. सेहवागने भारतासाठी १०४ कसोटी सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने ५० च्या सरासरीने ८५८६ धावा केल्या आहेत. तसेच, वीरेंद्र सेहवागने १५१ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या दरम्यान त्याने ३५ च्या सरासरीने ८२७३ धावा केल्या आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या