मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli चं Leicester साठी खास ट्वीट, म्हणाला…
virat kohli
virat kohli (photo- virat kohli, twitter)
26 June 2022, 18:33 ISTRohit Bibhishan Jetnavare
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
26 June 2022, 18:33 IST
  • भारताचा यष्टिरक्षक फलंदाज श्रीकर भरतनेही (srikar bharat) सराव सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. त्याने पहिल्या डावात नाबाद ७० धावा केल्या.

टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला एक टेस्ट मॅच, तीन टी-20 आणि तितकेच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत. कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ लीसेस्टरशायर विरुद्ध सराव सामना खेळत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या सामन्यामध्ये अनेक भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. माजी कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या डावात ९८ चेंडूत ६७ धावा केल्या. पहिल्या डावात त्याला केवळ ३३ धावा करता आल्या होत्या. या सामन्यानंतर बर्मिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळवला जाणार आहे. सराव सामन्यासाठी कोहलीने चाहत्यांचे आभार मानले. त्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

कोहलीने हे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. चाहत्यांना हे फोटो खूप आवडल्याचे दिसत आहे. सराव सामन्यासाठी कोहलीने लीसेस्टर आणि चाहत्यांचे आभार मानले. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "थँक्यू लीसेस्टर, बर्मिंगहॅम अवेट्स." कोहलीच्या या फोटोंना अवघ्या एका तासात ट्विटरवर ३ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी लाईक केले. तर ७०० हून अधिक लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोहलीच्या चाहत्यांनीही त्याचे कौतुक केले आहे.

विशेष म्हणजे, भारताचा यष्टिरक्षक फलंदाज श्रीकर भरतनेही सराव सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. त्याने पहिल्या डावात नाबाद ७० धावा केल्या. भरतच्या खेळीत ८ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. दुसऱ्या डावात त्याने ४३ धावा केल्या. दुसरीकडे, श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजाने दुसऱ्या डावात अर्धशतके झळकावली. जडेजा ५६ धावांवर नाबाद राहिला.