मराठी बातम्या  /  क्रीडा  /  विराटचा फसलेला प्रयोग, जो रुटने करुन दाखवलं; किंग कोहली मात्र अपयशी
virat kohli
virat kohli
23 June 2022, 21:00 ISTRohit Bibhishan Jetnavare
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
23 June 2022, 21:00 IST
  • भारताचे सलामीवी (team india) कर्णधार रोहित शर्माने (rohit sharma) ४७ चेंडूत २५ धावा केल्या, तर शुभमन गिलने २१ धावांचे योगदान दिले. त्याचवेळी हनुमा विहार ३ तर श्रेयस अय्यर शुन्यावर बाद झाला.

भारतीय संघ सध्या इंग्लंड (india vs england) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर टीम इंडिया (team india) एक टेस्ट मॅच, तीन वन-डे आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. मालिकेपूर्वी भारतीय संघ ग्रेस रोड मैदानावर आजपासून लीसेस्टरशायरविरुद्ध (Leicestershire) सराव सामना (Warm-up-Match) खेळत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या सामन्यादरम्यान विराट कोहली हा इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रुटची नक्कल करताना दिसला. विराट हा ज्यो रुटप्रमाणेच मैदानात जादूचे प्रयोग करताना दिसला. विराट आपली बॅट कोणत्याही आधाराशिवाय जमीनीवर उभी करण्याचा प्रयत्न करत होता. विराटने पहिल्या डावात ६९ चेंडूत ३३ धावा केल्या.

दरम्यान, जो रुट याने न्युझीलंडविरुद्धच्या एका कसोटीत कोणत्याही अधाराशिवाय बॅट जमिनीवर उभी केली होती. त्यावेळी रुटचे हात हे बॅटपासून दुर असलेले पाहायला मिळाले होते. हे कसं काय शक्य झालं याची चर्चा त्यावेळी सोशल मीडियावर रंगली होती.

असाच काहीसा प्रयत्न विराट कोहली आजच्या सामन्यात करताना दिसला. परंतू विराटचा हा प्रयोग सपशेल फसला. आधाराशिवाय बॅट उभी करणे विराटला जमले नाही.

या सराव सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय संघाच्या पूर्णपणे अंगलट आला. लीसेस्टरशायरच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजी पुर्णपणे ढेपाळल्याचे दिसली.

दरम्यान, भारताने पहिल्या दिवसातील तिसऱ्या सत्रापर्यंत ८ बाद २१४ धावा केल्या आहेत. श्रीकर भरत ५६ धावांवर खेळत आहे. त्यापूर्वी भारताचा निम्मा संघ ८१ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. भारताचे सलामीवी कर्णधार रोहित शर्माने ४७ चेंडूत २५ धावा केल्या, तर शुभमन गिलने २१ धावांचे योगदान दिले. त्याचवेळी हनुमा विहार ३ तर श्रेयस अय्यर शुन्यावर बाद झाला. याशिवाय अष्टपैलू रवींद्र जडेजा १३ धावांवर बाद झाला.

त्यानंतर भरत आणि विराट कोहली यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोमन वॉकर याने विराटला पायचीत करुन ही जोडी फोडली. विराटने ६९ चेंडूत ३३ धावा केल्या.