मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli: विराट-अनुष्का अन् वामिका... कोहलीची हृदयस्पर्शी पोस्ट, एकदा बघाच!

Virat Kohli: विराट-अनुष्का अन् वामिका... कोहलीची हृदयस्पर्शी पोस्ट, एकदा बघाच!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 09, 2023 04:53 PM IST

Virat Kohli Shares Anushka Sharma and Vamika Pic: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक हृदयस्पर्शी फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबत दिसत आहे.

Virat Kohli with Anushka Sharma And Vamika
Virat Kohli with Anushka Sharma And Vamika

Virat Kohli Shares Beautiful photo with Anushka Sharma And Vamika: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने बांगलादेश दौऱ्यानंतर कुटुंबासोबत क्वालिटी टाईम घालवला. त्यानंतर आज म्हणजेच (९ जानेवारी) तो श्रीलंकेविरुद्धच्या होम वनडे मालिकेसाठी (IND vs SL ODI) गुवाहाटीला पोहोचला आहे. यामुळे विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबत निवांत क्षण घालवताना दिसत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

विराट कोहलीने शेअर केलेल्या फोटोत तो आपली मुलगी वामिका आणि पत्नी अनुष्का शर्मासोबत समुद्रकिनारी वाळूवर चालताना दिसत आहे. या फोटोत विराट कोहली आणि अनुष्का शर्मा मुलगी वामिकाचा हात धरून चालत आहेत. यावेळी या कपलने वामिकाचा चेहरा चाहत्यांसोबत शेअर केला नाही. "रब्बा बख्शियां तू इन्नायन मेहेरबानियां, होर तेरेतो कुछ नी मंगडा, बस तेरा शुक्र अदा करदान" असे कॅप्शन विराटने या फोटोला दिले आहे.

कॅप्शनचा अर्थ काय?

पंजाबी भाषेतील हे कॅप्शन असून त्यांनी देवाचे आभार मानले आहेत. या कॅप्शनचा अर्थ असा आहे की देवा तू माझं इतकं आदरातिथ्य केलं आहेस, आता मी तुझ्याकडून काही मागत नाही, मी फक्त तुझे आभार मानतो.

दरम्यान, विराट कोहली बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग होता. एकदिवसीय मालिकेत त्याने दमदार शतक झळकावले, तर कसोटीत त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. या मालिकेनंतर त्याला विश्रांती देण्यात आली होती, तो श्रीलंकेविरुद्धच्या T20I मालिकेचा भाग नव्हता. आता विराट कोहली श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत पुनरागमन करत आहे. १० जानेवारीला होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात चाहत्यांना कोहलीकडून शानदार कामगिरीची अपेक्षा आहे.

WhatsApp channel