मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli: विराटच्या घडाळ्यावर चाहत्यांची नजर, किंमत माहितीय? फ्लॅट खरेदी करता येईल एवढी!

Virat Kohli: विराटच्या घडाळ्यावर चाहत्यांची नजर, किंमत माहितीय? फ्लॅट खरेदी करता येईल एवढी!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Oct 06, 2022 03:03 PM IST

Virat Kohli Watch: विराट कोहलीने T20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी सहकारी खेळाडूंसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत विराटचे महागडे घड्याळही दिसत आहे.

Virat Kohli Watch
Virat Kohli Watch

T20 विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी पहाटे ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सोशल मीडियावर एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह सर्व खेळाडू दिसत आहेत. सलामीवीर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघाकडून खूप अपेक्षा आहेत. भारताने एकदाच (२००७ साली) T20 विश्वचषक जिंकला होता. आता १५ वर्षांचा दुष्काळ संपवण्याच्या उद्देशाने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.

विराट कोहलीने शेअर केला फोटो

टीम इंडियाचा विश्वासू फलंदाज विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी मुंबई विमानतळावर सहकारी खेळाडूंसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याच्यासोबत युजवेंद्र चहल आणि वेगवान गोलंदाज हर्षल पटेलही दिसत आहेत. विराटने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ऑस्ट्रेलियाला निघत आहे. येणारे दिवस खूप छान असतील. हा फोटो त्याने चहल आणि हर्षललाही टॅग केला आहे.

चाहत्यांची नजर विराटच्या घड्याळावर

विराट कोहलीच्या या फोटोमध्ये त्याचे घड्याळही दिसत आहे. याकडे अनेक चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. लोकांना त्याची किंमतही जाणून घ्यायची होती. दरम्यान, हे घड्याळ रोलेक्स कंपनीचे आहे. रोलेक्सच्या वेबसाइटवर असे आढळून आले की डेटन या मॉडेलची किंमत सुमारे २८ लाख रुपये आहे. एवढेच नाही तर हे मॉडेल आपल्या आवडीनुसार बनवता येते. विराटने जी मॉडेल घातली आहे ती गोल्डन प्लेटेड आहे. विराटला महागड्या घड्याळांचा शौकीन मानले जाते. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्याही आहेत.

परिस्थितीशी जुळवून घेता यावे, यासाठी लवकर रवाना

टीम इंडिया २३ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने टी-20 विश्वचषकातील आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. याआधी हा संघ पर्थ येथील प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणार आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी याबद्दल सांगितले होते की, स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाला लवकर रवाना होण्याचा उद्देश खेळाडूंना तेथील परिस्थितीशी जुळवून घेणे हा आहे. विशेषत: ज्या क्रिकेटपटूंनी आतापर्यंत त्या देशात एकही सामना खेळलेला नाही.

WhatsApp channel

संबंधित बातम्या