मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WTC Final 2023 : विराट कोहलीसह सात खेळाडू इंग्लंडला रवाना, WTC फायनलसाठी आखणार व्यूहरचना

WTC Final 2023 : विराट कोहलीसह सात खेळाडू इंग्लंडला रवाना, WTC फायनलसाठी आखणार व्यूहरचना

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 04, 2023 06:50 PM IST

WTC Final 2023 : आरसीबी आयपीएलमधून बाहेर झाल्यानंतर आता विराट कोहलीसह टीम इंडियाचे सहा खेळाडू इंग्लंडला रवाना होणार आहे.

Virat Kohli In WTC Final 2023
Virat Kohli In WTC Final 2023

ICC World Test Championship 2023 Live Updates : यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबीचं आव्हान संपलं आहे. २८ मे रोजी आयपीएलची फायनल झाल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आयसीसी कसोटी विश्वचषकाची फायनल खेळणार आहे. त्यापूर्वीच आता विराट कोहली सात खेळाडूंसह इंग्लंडला आज दुपारी रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आरसीबी, दिल्ली, राजस्थान आणि केकेआर या संघातील खेळाडू इंग्लंडला रवाना झाले आहे. आयपीएल संपल्यानंतर टीम इंडियाची दुसरी तुकडी इंग्लंडला रवाना होणार आहे. आयपीएल संपल्यानंतर विराट कोहलीने संपूर्ण फोकस आयसीसी कसोटी विश्वचषकाच्या फायनलवर केल्याचं समजतं.

जून महिन्यात लंडनच्या द ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर कसोटी विश्वचषकाची फायनल खेळली जाणार आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंडला रवाना झाला आहे. त्यानंतर आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह विराट कोहली, मोहम्मद सिराज, उमेश यादव, रवीचंद्रन आश्विन, शार्दूल ठाकूर, जयदेव उनादकट आणि अक्षर पटेल हे आज दुपारी विशेष विमानाने इंग्लंडसाठी रवाना होणार आहेत. आयपीएलमध्ये अखेरच्या सामन्यात झेल पकडताना विराट कोहली जखमी झाला आहे, परंतु त्याची दुखापत किती गंभीर आहे, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. त्यामुळं विराट कोहली आयसीसी कसोटी विश्वचषकासाठी उपलब्ध असेल की नाही, याबाबत बीसीसीआयने कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु आता आयपीएलमधील आव्हान संपताच विराट कोहली सात खेळाडूंसह इंग्लंडला रवाना झाल्यामुळं ऑस्ट्रेलियन संघाचं टेन्शन वाढलं आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपसाठी भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा , विराट कोहली, अजिंक्य रहाणे, आर अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्द शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, केएस भरत (विकेटकिपर), जयदेव उनाडकट आणि इशान किशन

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपसाठी ऑस्ट्रेलियन संघ-

पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क आणि डेव्हिड वॉर्नर

WhatsApp channel