मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat-Ishan Kishan Dance: टीम इंडियाच्या या डान्सची सर्वत्र चर्चा, कोहली-किशनचे ठुमके व्हायरल
virat kohli & ishan kishan dance
virat kohli & ishan kishan dance

Virat-Ishan Kishan Dance: टीम इंडियाच्या या डान्सची सर्वत्र चर्चा, कोहली-किशनचे ठुमके व्हायरल

13 January 2023, 14:00 ISTRohit Bibhishan Jetnavare

virat kohli & ishan kishan dance video: इशान किशन या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता, पण संघाच्या शानदार विजयानंतर तो खूप नाचताना दिसला. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात किशनने विक्रमी द्विशतक झळकावले होते.

India Vs Sri Lanka 2nd ODI Match highlight : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि युवा यष्टीरक्षक इशान किशन यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावरचा आहे. या मैदानावर भारतीय संघाने १२ जानेवारीला म्हणजेच गुरुवारी श्रीलंकेचा ४ विकेटने पराभव केला. या विजयानंतर भारतीय संघाने मोठा जल्लोष साजरा केला.

ट्रेंडिंग न्यूज

इशान किशन या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता, पण संघाच्या शानदार विजयानंतर तो खूप नाचताना दिसला. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात किशनने विक्रमी द्विशतक झळकावले होते. त्यानंतर त्याला श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत संधी मिळेल अशी अपेक्षा होती, पण रोहित शर्माने त्याच्यापेक्षा शुभमन गिलला पसंती दिली आणि सलामीसाठी त्याची निवड केली. गिलने पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते, तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात २१ धावांची खेळी केली होती.

सामन्यात काय घडलं?

दुसऱ्या सामन्यात, श्रीलंकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ३९.४ षटकात सर्व गडी गमावून २१५ धावा केल्या होत्या. तर भारताने ६ विकेट गमावून २१९ धावा करून सामना जिंकला. या सामन्यात कुलदीप यादव आणि सिराज यांनी सर्वाधिक ३-३ बळी घेतले, तर केएल राहुलने फलंदाजीत कमाल केली. निर्णायक प्रसंगी राहुलने शानदार फलंदाजी करत नाबाद ६४ धावांची खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. विराट कोहलीने गुवाहाटीमध्ये शानदार शतक झळकावले होते, पण कोलकात्यात तो फलंदाजीत काही खास करू शकला नाही आणि केवळ ४ धावा करून बाद झाला.

भारताने सलग दोन सामने जिंकून मालिका २-० अशी जिंकली आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना तिरुअनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे.