मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat & Anushka: वामिकाचा फोटो शेअर करताना विराटनं लिहिलं पंजाबीत कॅप्शन, याचा अर्थ काय? जाणून घ्या

Virat & Anushka: वामिकाचा फोटो शेअर करताना विराटनं लिहिलं पंजाबीत कॅप्शन, याचा अर्थ काय? जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 09, 2023 05:11 PM IST

Virat Kohli with Anushka And Vamika: विराटने शेअर केलेल्या फोटोत तो आपली मुलगी वामिका आणि पत्नी अनुष्का शर्मासोबत समुद्रकिनारी वाळूवर चालताना दिसत आहे. या फोटोत विराट आणि अनुष्काने मुलगी वामिकाचा हात धरला आहे आणि ते वाळूवर चालत आहेत. यावेळी या कपलने वामिकाचा चेहरा चाहत्यांसोबत शेअर केला नाही.

Virat Kohli with Anushka And Vamika
Virat Kohli with Anushka And Vamika

Virat Kohli Shares photo with Anushka And Vamika: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कुटुंबासोबत थोडा क्वालिटी टाईम घालवला. यानंतर तो आज सोमवारी (९ जानेवारी) श्रीलंकेविरुद्धच्या होम वनडे मालिकेसाठी (IND vs SL ODI) गुवाहाटीला पोहोचला. अशातच किंग कोहलीने इंस्टाग्रामवर एक गोंडस फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिका दिसत आहेत. हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

विराटने शेअर केलेल्या फोटोत तो आपली मुलगी वामिका आणि पत्नी अनुष्का शर्मासोबत समुद्रकिनारी वाळूवर चालताना दिसत आहे. या फोटोत विराट आणि अनुष्काने मुलगी वामिकाचा हात धरला आहे आणि ते वाळूवर चालत आहेत. यावेळी या कपलने वामिकाचा चेहरा चाहत्यांसोबत शेअर केला नाही.

विरानटे मस्त कॅप्शनही लिहिले

विराटने या फोटोसोबत एक मस्त कॅप्शनदेखील लिहिले आहे. त्याने हे कॅप्शन पंजाबी भाषेत लिहिले आहे. त्याने लिहिले की, "रब्बा बख्शियां तू इन्नायन मेहेरबानियां, होर तेरेतो कुछ नी मंगडा, बस तेरा शुक्र अदा करदान".

कॅप्शनचा अर्थ काय?

पंजाबी भाषेतील या कॅप्शनता अर्थ काय आहे. असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे. विराटने या कॅप्शनच्या माध्यमातून देवाचे आभार मानले आहेत. या कॅप्शनचा अर्थ असा आहे, की “देवा तू माझं इतकं आदरातिथ्य केलं आहेस, आता मी तुझ्याकडून काहीही मागत नाही, मी फक्त तुझे आभार मानतो आहे”.

बांगलादेश दौऱ्यानंतर विराटला विश्रांती

विराट कोहली बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग होता. एकदिवसीय मालिकेत त्याने दमदार शतक झळकावले, तर कसोटीत त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. या मालिकेनंतर त्याला विश्रांती देण्यात आली होती, तो श्रीलंकेविरुद्धच्या T20I मालिकेचा भाग नव्हता. आता विराट कोहली श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत पुनरागमन करत आहे. १० जानेवारीला होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात चाहत्यांना कोहलीकडून शानदार कामगिरीची अपेक्षा आहे.

भारत-श्रीलंका वनडे मालिका

सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरु होतील

पहिला वनडे- १० जानेवारी (गुवाहटी)

दुसरा वनडे- १२ जानेवारी (कोलकाता)

तिसरा वनडे- १५ जानेवारी (तिरुअनंतपुरम

WhatsApp channel