मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli : विराटसाठी ११ वर्षीय खेळाडूचा उपवास, पाहा नेमकं प्रकरण काय?

Virat Kohli : विराटसाठी ११ वर्षीय खेळाडूचा उपवास, पाहा नेमकं प्रकरण काय?

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 17, 2022 10:12 PM IST

माजी कर्णधार विराट कोहली फॉर्ममध्ये परत यावा, यासाठी भारताची युवा खेळाडू पूजा बिश्नोईने रविवारी एकदिवसाचा उपवास केला आहे. बिष्णोईने ट्वीट करत ही माहिती दिली आहे

virat kohli
virat kohli

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. जवळपास अडीच वर्षांपासून त्याला कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावता आलेले नाही, की मॅचविनिंग इनिंग खेळता आलेली नाही. त्यामुळे त्याच्यावर बरीच टीकाही होत आहे. एकीकडे कोहलीच्या फॉर्ममध्ये परतण्यासाठी अनेक माजी क्रिकेटपटू वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देत आहेत. त्याच वेळी, भारतातील एका ११ वर्षीय अॅथलीटने विराटसाठी वेगळाच फंडा वापरला आहे.

माजी कर्णधार विराट कोहली फॉर्ममध्ये परत यावा, यासाठी भारताची युवा खेळाडू पूजा बिश्नोईने रविवारी एकदिवसाचा उपवास केला आहे. बिष्णोईने ट्वीट करत ही माहिती दिली आहे. “विराट कोहली सरांच्या फॉर्मसाठी मी आज देवाचे व्रत ठेवले आहे”. असे ट्वीटमध्ये म्हटले आहे.

मात्र, तरीही कोहली आज अपयशी ठरला. तो तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात २२ चेंडूत १७ धावा करून बाद झाला.

आतापर्यंतच्या महान फलंदाजांपैकी एक असलेला कोहली धावा काढण्यासाठी धडपडत आहे. ३३ वर्षीय विराटटने त्याचे शेवटचे शतक नोव्हेंबर २०१९ मध्ये केले होते. विराटने गेल्या सहा वर्षांत वनडेत २०१७ ते २०१९ या कालावधीत त्याने ६६ डावांत ७९.१९ च्या सरासरीने ४०३९ धावा केल्या होत्या. यामध्ये १७ शतकांचा समावेश आहे. तर २०२० पासून आतापर्यंत विराटने २० डावांमध्ये ३६.७५ च्या सरासरीने ७३५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एकही शतक झळकावले नाही.

दरम्यान, अॅथलीट पूजा बिश्नोई ही विराट कोहली फाउंडेशन (VKF) च्या मदतीने स्पर्धेसाठी तयारी करत आहे. ती एक ट्रॅक अॅथलीट असून तिच्या नावावर अनेक विक्रम आहेत. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी सिक्स-पॅक अॅब्स असलेली ती जगातील सर्वात तरुण मुलगी ठरली. उसेन बोल्टप्रमाणे अॅथलीट बनण्याचे पूजाचे स्वप्न आहे. ती जोधपूरच्या गुडा-बिश्नोई गावची रहिवासी आहे.

पूजाचे मामा श्रावण बिश्नोई हे तिचे प्रशिक्षक आहेत. श्रावण बिष्णोई यांनीच पुजामध्ये ही आवड अॅथलीट बनण्याची आवड निर्माण केली आहे. इन्स्टाग्रामवर पूजाचा उत्साह पाहून विराट कोहली फाऊंडेशनने तिचा प्रवास, पोषण, प्रशिक्षण यासह सर्व खर्च उचलण्याचा निर्णय घेतला. पूजा वयाच्या चौथ्या वर्षापासून सराव करत आहे. ती दिवसाचे आठ तास ट्रेनिंग करते.

WhatsApp channel