मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli Century : तुफानी शतकानंतर कोहलीच्या नावावर हे दोन ‘विराट’ रेकॉर्ड, जाणून घ्या

Virat Kohli Century : तुफानी शतकानंतर कोहलीच्या नावावर हे दोन ‘विराट’ रेकॉर्ड, जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 18, 2023 11:33 PM IST

Virat Kohli 6th ipl century : विराट कोहलीने ६३ चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकारांसह १०० धावांची खेळी केली. कोहलीचे आयपीएल कारकिर्दीतील हे सहावे शतक आहे. सर्वाधिक (Virat Kohli new record) शतके झळकावण्याच्या बाबतीत कोहलीने ख्रिस गेलची बरोबरी केली आहे.

Virat Kohli Century
Virat Kohli Century

Virat Kohli Has Completed 7500 Runs For RCB IPL 2023 : आयपीएल 2023 च्या ६५व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला. १८ मे (गुरुवार) रोजी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने आरसीबीला विजयासाठी १८७ धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी शेवटच्या षटकात पूर्ण केले. आरसीबीच्या विजयाचे हिरो विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस ठरले.

विराट कोहलीने ६३ चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकारांसह १०० धावांची खेळी केली. कोहलीचे आयपीएल कारकिर्दीतील हे सहावे शतक आहे. सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत कोहलीने ख्रिस गेलची बरोबरी केली आहे.

या सोबतच विराटने आणखी एक विक्रम रचला आहे. विराट कोहली आयपीएलमध्ये आरसीबीसाठी ७५०० धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. या धावा आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग मिळून आहेत.

विराटने आयपीएलमध्ये आरसीबीसाठी २३६ सामने खेळले आहेत. यात त्याने ६ शतके ठोकली आहेत. 

आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके:

६ - ख्रिस गेल

६ - विराट कोहली

५ - जोस बटलर

विराट-डू प्लेसिसची पहिल्या विकेटसाठी १७२ धावांची भागीदारी

दरम्यान, तत्पूर्वी, १८७ धावांचा पाठलाग करताना डू प्लेसिस आणि कोहली यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १७.५ षटकांत १७२ धावांची तुफानी भागीदारी केली. 

आरसीबीसाठी सर्वोच्च सलामीची भागीदारी:

१८१* - विराट कोहली- देवदत्त पडिक्कल विरुद्ध आरआर, मुंबई , २०२१

१७२- विराट कोहली-फाफ डु प्लेसिस विरुद्ध एसआरएच, हैदराबाद, आज

१६७- ख्रिस गेल-तिलकरत्ने दिलशान विरुद्ध पीडब्ल्यूआय, बंगलोर, २०१३

१४८- विराट कोहली-फाफ डू प्लेसिस विरुद्ध मुंबई, बंगलोर, २०२३

हैदराबादच्या क्लासेनचं शतक व्यर्थ

हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १८६ धावा केल्या होत्या. हैदराबादकडून हेनरिक क्लासेनने वादळी शतक झळकावून इतिहास रचला. सनरायझर्स हैदराबादसाठी शतक झळकावणारा क्लासेन हा आयपीएलचा चौथा खेळाडू बनला आहे. यापूर्वी डेव्हिड वॉर्नर आणि हॅरी ब्रूक यांनी हा पराक्रम केला आहे.

क्लासेनने आजच्या सामन्यात ५१ चेंडूत १०४ धावा केल्या. या शतकाच्या बळावरच हैदराबादने ५ विकेट गमावून १८६ धावा केल्या. क्लासेनने ४९ चेंडूत १०० धावा पूर्ण केल्या. या खेळीत ८ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.

WhatsApp channel