मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli: क्विक बॉलर..., विराट आजच्या सामन्यात गोलंदाजी करणार? नेटमध्ये कसून सराव
virat kohli
virat kohli (photo- pca twitter)

Virat Kohli: क्विक बॉलर..., विराट आजच्या सामन्यात गोलंदाजी करणार? नेटमध्ये कसून सराव

20 September 2022, 13:58 ISTRohit Bibhishan Jetnavare

Virat Kohli Bowling ind vs aus t20: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली फलंदाजीसोबतच गोलंदाजीचीही तयारी करत असल्याचे दिसून येत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यापूर्वी विराट कोहलीने गोलंदाजीचाही कसून सराव केला. या सरावाचे काही फोटो सोशल मीडियावरही शेअर करण्यात आले आहेत.

टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला T20 सामना आज (२० सप्टेंबर) मोहाली येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया पूर्णपणे तयार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग-११ काय असेल याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अशातच टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली फलंदाजीसोबतच गोलंदाजीचीही तयारी करत असल्याचे दिसून येत आहे. या सामन्यापूर्वी विराट कोहलीने गोलंदाजीचाही कसून सराव केला आहे. या सरावाचे काही फोटो सोशल मीडियावरही शेअर करण्यात आले आहेत. पंजाब क्रिकेट असोसिएशनने (PCA) ट्विटरवर हे फोटो पोस्ट केले आहेत. कोहलीने मोहालीच्या IS बिंद्रा स्टेडियममध्ये जवळपास अर्धा तास गोलंदाजीचा सराव केला.

विराटचे फोटो शेअर करताना PCA ने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'बघू या सामन्यात गोलंदाजीची ओपनिंग कोण करेल.' यावर युजर्सनी अनेक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, “संघाला ७ व्या गोलंदाजाचा पर्याय मिळाला आहे”.

कोहलीने अलीकडेच आशिया कपमध्ये हाँगकाँगविरुद्ध गोलंदाजी केली होती. त्या सामन्यात तब्बल ६ वर्षांनी कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात गोलंदाजी केली होती. यापूर्वी कोहलीने ३१ मार्च २०१६ रोजी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात गोलंदाजी केली होती. त्यावेळी त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्याने १.४ षटकात १५ धावा देत एक विकेट घेतली होती.

आशिया कपमध्ये विराट कोहलीने हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात एक षटक टाकून ६ धावा दिल्या. मात्र, त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.

कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्पेशल फलंदाज म्हणून खेळतो. तो क्वचितच गोलंदाजी करताना दिसतो. कोहलीने आतापर्यंत १०२ कसोटी सामन्यांच्या ११ डावांमध्ये गोलंदाजी केली आहे. यादरम्यान तो एकही बळी घेऊ शकला नाही.