मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli: किंग कोहली आता पंतप्रधान मोदींच्या स्पेशल क्लबमध्ये, जाणून घ्या काय भानगड?
Virat Kohli
Virat Kohli

Virat Kohli: किंग कोहली आता पंतप्रधान मोदींच्या स्पेशल क्लबमध्ये, जाणून घ्या काय भानगड?

13 September 2022, 15:31 ISTRohit Bibhishan Jetnavare

Virat Kohli 50 million followers on twitter: ट्विटरवर सर्वाधिक फॉलो होणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. तर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सोबतच, विराट भारतात सर्वाधिक फॉलो होणाऱ्या व्यक्तींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या यादीत पंतप्रधान मोदी क्रमांक एकवर आहेत.

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने अजून कारनामा केला आहे. सोशल मीडिया साईट ट्विटरवर विराट कोहलीच्या फॉलोअर्सची संख्या ५ कोटींच्या पार गेली आहे. हा टप्पा गाठणारा कोहली हा जगातील पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याच वेळी, कोहली दुसरा भारतीय आहे, ज्याच्या फॉलोअर्सची संख्या ५ कोटींहून अधिक आहेत. यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रमांक एकवर आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

कोहली जगात २९ व्या क्रमांकावर

ट्विटरवर सर्वाधिक फॉलो होणाऱ्यांचा यादीत कोहली जगात २९ व्या क्रमांकावर आला आहे. या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ व्या क्रमांकावर आहेत. मोदींना जवळपास ८२.३ दशलक्ष लोक फॉलो करतात. या यादीत पीएमओ इंडियाचे ट्विटर अकाउंट २८ व्या क्रमांकावर आहे. PMOIndia ला ५०.५ दशलक्ष लोक फॉलो करतात.

तर भारतात कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर पंतप्रधान कार्यालयाचे (PMO) ट्वीटर आहे.  

क्रिकेटपटूंमध्ये विराट नंबर वन

ट्विटरवर सर्वाधिक फॉलो होणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. तर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या ट्विटरवर फॉलोअर्सची संख्या ३७.८ दशलक्ष आहे. याशिवाय ट्विटरवर फॉलो केलेल्या टॉप १०० लोकांच्या यादीत इतर कोणत्याही क्रिकेटरचा समावेश नाही. 

फक्त ६ लोकांचे ट्वीटर फॉलोवर्स १०० दशलक्षाहून अधिक

जगातील फक्त ६ लोकांच्याच ट्विटर फॉलोवर्सची संध्या १०० दशलक्षाहून अधिक आहे. या यादीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (१३३ दशलक्ष), जस्टिन बीबर (११४), कॅटी पेरी (१०९ दशलक्ष), रिहाना (107 दशलक्ष), एलॉन मस्क (१०५.५ दशलक्ष) आणि रोनाल्डो (१०३.२दशलक्ष) यांचा समावेश आहे.

विराट कोहली फेसबूक आणि इन्स्टाग्रामवरही लोकप्रिय

दरम्यान, विराट कोहली फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही खूप लोकप्रिय आहे. फेसबुकवर सुमारे ५० दशलक्ष लोक त्याला फॉलो करतात. त्याच वेळी, इंस्टाग्रामवर त्याच्या फॉलोअर्सची संख्या २११ दशलक्ष (सुमारे २१ कोटी) आहे.