मराठी बातम्या  /  क्रीडा  /  virat kohli: किंग इज बॅक! विराट कोहलीनं झळकावलं ७१ वं आंतरराष्ट्रीय शतक, ३ वर्षांची प्रतीक्षा संपली
virat kohli
virat kohli

virat kohli: किंग इज बॅक! विराट कोहलीनं झळकावलं ७१ वं आंतरराष्ट्रीय शतक, ३ वर्षांची प्रतीक्षा संपली

08 September 2022, 21:05 ISTRohit Bibhishan Jetnavare

आशिया चषकाच्या सुपर-४ फेरीत भारताची गुरुवारी अफगाणिस्तानशी लढत होत आहे. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा शेवटचा सामना आहे.

आशिया चषकाच्या सुपर-४ फेरीत भारताचा सामना आज अफगाणिस्तानशी होत आहे. या सामन्यात विराट कोहलीच्या ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतीक्षा आता संपली आहे. कोहलीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७१ वे शतक झळकावले आहे. कोहलीने ५३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. शतक ठोकण्याची कोहलीची शैलीही शानदार होती. त्याने फरीद मलिकच्या गोलंदाजीवर डीप-मिडविकेटवर षटकार ठोकून शतक पूर्ण केले.

ट्रेंडिंग न्यूज

विराटने सामन्यात ६१ चेंडूत १२२ धावा चोपल्या. त्याने या खेळीत १२ चौकार आणि ६ षटकार ठोकले. विशेष म्हणजे, विराटने ३३ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक केले आहे. यापूर्वी विराटने नोव्हेंबर २०१९ मध्ये कोलकाता येथे डे-नाईट कसोटीत बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले होते.

विराट कोहलीने -

१०२० दिवस

दोन वर्षे, नऊ महिने, १६ दिवस

३३ महिने, १६ दिवस

१४५ आठवडे आणि ५ दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक केले.

दरम्यान, आशिया चषकाच्या सुपर-४ फेरीत भारताची गुरुवारी अफगाणिस्तानशी लढत होत आहे. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २ बाद २१२ धावा केल्या आहेत. टीम इंडियासाठी विराट कोहलीने ६१ चेंडूत नाबाद १२२ धावांची खेळी केली. केएल राहुलने ४१ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. तर ऋषभ पंत १६ चेंडूत २० धावा करून नाबाद राहिला.

दरम्यान, दोन्ही संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा शेवटचा सामना आहे. पाकिस्तानपाठोपाठ टीम इंडियाचा श्रीलंकेकडून पराभव झाला. त्याचवेळी अफगाणिस्तानला आधी श्रीलंकेने आणि नंतर पाकिस्तानने पराभूत केले होते.