भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटचे भारतात पुनरागमन झाल्यानंतर तिचे भव्य शैलीत स्वागत करण्यात आले. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये विनेश पदक जिंकू शकली नाही. सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी तिला अपात्र ठरवण्यात आले.
पण आता विनेश पॅरिसहून घरी परतली आहे. भारतात आल्यावर विनेशचे भव्य स्वागत करण्यात आले. दिल्ली विमानतळापासून ते गावी पोहोचेपर्यंत चाहत्यांनी विनेशला भरभरून प्रेम दिले.
अशातच आता सोशल मीडियावर विनेशची एक पोस्ट व्हायरल होत आहे. विनेशला १६ कोटींहून अधिकची रक्कम बक्षीस मिळाल्याचा दावा केला जात आहे. पण या दाव्याचे सत्य काही वेगळेच आहे. विनेशचे पती सोमवीर राठी यांनी हे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
वास्तविक, देशातील विविध संस्थांकडून विनेशला बक्षिसाची रक्कम दिल्याचा दावा केला जात आहे. विनेशला हरियाणा ट्रेड ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल जाट महासभा आणि पंजाब जाट असोसिएशनने प्रत्येकी २ कोटी रुपये दिले आहेत.
त्याचप्रमाणे पोस्टमध्ये नमूद केलेली एकूण रक्कम १६ कोटी ३० लाख रुपये आहे. मात्र विनेशचे पती सोमवार राठी यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. X वर पोस्ट शेअर करून त्याने हे सर्व चुकीचे असल्याचे सांगितले आहे.
विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक निश्चित होते. मात्र सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी तिचे वजन जास्त असल्याचे आढळून आले. विनेशचे वजन १०० ग्रॅम जास्त होते. या कारणामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले. यानंतर विनेशनेही रौप्यपदकासाठी क्रीडा लवादाच्या न्यायालयात दाद मागितली.
मात्र तिचे अपील फेटाळण्यात आले. विनेशसोबतच तिच्या चाहत्यांनाही यामुळे मोठा धक्का बसला आहे. विनेश भारतात परतल्यानंतर तिचे रंजक पद्धतीने स्वागत करण्यात आले.