Vinesh Phogat : ऑलिम्पिक फायनलसाठी अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल-vinesh phogat hospitalised after olympics disqualification boxer vijender singh said big conspiracy against wrestlers ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Vinesh Phogat : ऑलिम्पिक फायनलसाठी अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

Vinesh Phogat : ऑलिम्पिक फायनलसाठी अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

Aug 07, 2024 02:21 PM IST

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटची प्रकृती खालावली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Vinesh Phogat : ऑलिम्पिक फायनलसाठी अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
Vinesh Phogat : ऑलिम्पिक फायनलसाठी अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल (PTI)

भारतीय स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधून अपात्र ठरली आहे. विनेशने ५० किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत विनेशचा सामना अमेरिकेची कुस्तीपटू सारा हिच्याशी होणार होता, मात्र सामन्यापूर्वीच विनेश फोगाट पुढील सामन्यांसाठी अपात्र ठरली आहे.

वजन वाढल्यामुळे विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आले. विनेशचे वजन काही ग्रॅम जास्त होते. यामुळे आता ती अंतिम सामन्यासाठी मॅटवर येणार नाही. याहून निराशाजनक बाब म्हणजे भारताच्या या चॅम्पियन कन्येला एकही पदक मिळणार नाही.

अशातच आता माहिती आली आहे की विनेश फोगटची प्रकृती खालावली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डिहायड्रेशनमुळे विनेश फोगटला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये नाही तर स्पोर्ट्स व्हिलेजमधील पॉलीक्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कोणतीही गंभीर बाब नसल्याचीही माहिती मिळाली आहे. तिला लवकरच डिस्चार्ज मिळू शकतो.

विनेश फोगटचे वजन १०० ग्रॅमने वाढले होते, यामुळे तिला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आले. सर्वांना विनेशकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. काल रात्री त्याने उपांत्य फेरीत शानदार विजयाची नोंद केली होती.

भारतीय पैलवानंविरुद्ध मोठा कट- विजेंदर सिंग

दरम्यान, आता या प्रकरणावर बॉक्सर विजेंदर सिंग याने प्रतिक्रिया दिली आहे. विजेंदर सिंग याने विनेशला अपात्र ठरवणे हा मोठा कट असल्याचे म्हटले आहे.

आपल्या पैलवानांसोबत हे मोठे षडयंत्र असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय विनेशला वजन कमी करण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा होता, असेही तो म्हणाला. विजेंदरने सांगितले की, याआधी कोणत्याही खेळाडूबाबतीत असे काही पाहिले नव्हते.

फोगट कुटुंबीयांचा फेडरेशनवर आरोप

विनेश फोगटच्या कुटुंबीयांनी कुस्ती फेडरेशनवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय त्यांनी याप्रकरणी सरकारवरही ताशेरे ओढले. यामध्ये ब्रिजभूषण, शरण सिंह आणि सरकारचा सहभाग असल्याचे कुटुंबाच्या वतीने सांगण्यात आले.