रक्त काढलं, केस कापले… सपोर्ट स्टाफनं विनेशचं वजन २ किलोवरून १०० ग्रॅमवर आणलं, पण…-vinesh phogat disqualification haircut to drawing out blood vinesh phogat coaching staff tried everything ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  रक्त काढलं, केस कापले… सपोर्ट स्टाफनं विनेशचं वजन २ किलोवरून १०० ग्रॅमवर आणलं, पण…

रक्त काढलं, केस कापले… सपोर्ट स्टाफनं विनेशचं वजन २ किलोवरून १०० ग्रॅमवर आणलं, पण…

Aug 07, 2024 03:21 PM IST

विनेश फोगटचे वजन कमी करण्यासाठी प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफने सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु तिचे वजन १००-१५० ग्रॅम अधिक आले आणि तिला अपात्र ठरविण्यात आले.

Vinesh Phogat disqualification : रक्त काढलं, केस कापले… सपोर्ट स्टाफनं विनेशचं वजन २ किलोवरून १०० ग्रॅमवर आणलं, पण…
Vinesh Phogat disqualification : रक्त काढलं, केस कापले… सपोर्ट स्टाफनं विनेशचं वजन २ किलोवरून १०० ग्रॅमवर आणलं, पण… (X)

भारताची कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या फायनलसाठी अपात्र ठरली आहे. विनेशेने ५० किलो वजनी एकाच दिवशी मंगळवारी (६ ऑगस्ट) तीन सामने जिंकून फायनल गाठली होती.

भारतीय चाहते ६ ऑगस्टच्या रात्री विनेश फोगटच्या सुवर्णपदकाचे स्वप्न घेऊन झोपी गेले होते, पण ७ ऑगस्टच्या सकाळी हे स्वप्न अचानक भंगले. पॅ

फायनल सामन्याआधी वजन तपासले असता, विनेशचे वजन १०० ते १५० ग्रॅम अधिक निघाले, त्यामुळे ती अपात्र ठरली आणि आता तिला कोणतेही पदक मिळणार नाही. खरे तर ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या नियमांनुसार दोन दिवसांत सामने होतात आणि दोन्ही दिवशी सहभागी होणाऱ्या कुस्तीपटूंचे वजन केले जाते.

विनेशचे वजन कमी करण्यासाठी प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफने सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु तिचे वजन १००-१५० ग्रॅम अधिक आले आणि तिला अपात्र ठरविण्यात आले.

वजन कमी दिसावे, यासाठी विनेशचे केस कापण्यात आले, तिचे रक्त काढण्यात आले, पण त्याचा फायदा झाला नाही. विनेश सध्या रुग्णालयात आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी सांगितले की, डिहायड्रेशनमुळे विनेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विनेशने ज्या प्रकारे प्री-क्वार्टर फायनल, क्वार्टर फायनल आणि सेमीफायनल मॅच जिंकल्या ते पाहून ती यावेळी सुवर्णपदक घेऊन येईल असे वाटत होते. पण ते शक्य होऊ शकले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, विनेशचे वजन फायनलच्या आदल्या रात्रीपेक्षा सुमारे दोन किलो जास्त होते, त्यानंतर प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफने मिळून तिचे वजन कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. नियमात राहून विनेशचे रक्तही काढले गेले आणि केसही कापले गेले, पण एवढे करूनही १००-१५० ग्रॅम अतिरिक्त वजनाने तिचे पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले.

कुस्तीमध्ये वजनाचा नियम काय आहे?

वजनाबाबतच्या नियमांनुसार कुस्तीपटूला ज्या दिवशी खेळायचे आहे, त्या दिवशी त्याचे वजन घेतले जाते. प्रत्येक वजनी गटाचे सामने दोन दिवसांत होतात, त्यामुळे अंतिम फेरी गाठणाऱ्या कुस्तीपटूंना दोन्ही दिवशी वजन करावे लागते. 

कुस्तीपटूला वजन करण्यासाठी ३० मिनिटांचा अवधी दिला जातो. या काळात त्यांना हव्या तितक्या वेळा वजन करता येते. यावेळी कुस्तीपटूला कोणताही संसर्गजन्य आजार तर नाही ना, किंवा त्यांची नखं कापली आहेत की नाही याची तपासणी केली जाते. 

ज्या कुस्तीपटूंना सलग दुसऱ्या दिवशी स्पर्धेत भाग घ्यावा लागतो, त्यांना वजन करण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी मिळतो. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या (UWW) नियमांनुसार कुस्तीपटूचे वजन निर्धारित वजनापेक्षा जास्त असेल तर त्याला अपात्र ठरवले जाते.