वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटर आणि 'युनिव्हर्स बॉस' म्हणून ओळखला जाणारा ख्रिस गेल सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. कारण, आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे (RCB) पूर्वीचे मालक आणि सध्या फरार असलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल ट्विटरवर गेलसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यानंतर मल्ल्या आणि गेल दोघेही सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. ख्रिस गेल हा आपला चांगला मित्र असल्याचे विजय मल्ल्या यांनी या ट्वीटमध्ये आहे आहे.
वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर ख्रिस गेल हा अनेक वर्षे आरसीबीचा भाग होता. गेलसोबतच फोटो पोस्ट केल्यानंतर मल्ल्या यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "माझा चांगला मित्र क्रिस्टोफर हेन्री गेल, युनिव्हर्स बॉस सोबत छान भेट झाली. जेव्हापासून मी त्याला आरसीबी संघासाठी विकत घेतले तेव्हापासून आमची खूप चांगली 'सुपर फ्रेंडशिप' आहे. खरेदी केलेला आतापर्यंतचा सर्वोत्तम खेळाडू".
या ट्विटला ४५ हजारांहून अधिक लाईक्स आणि अनेक कमेंट्स आल्या आहेत. यानंतर नेटकऱ्यांनी मल्ल्यासोबतच गेललाही ट्रोल केले आहे. याशिवाय हे ट्विट २ हजारांहून अधिक वेळा रिट्विट देखिल झाले आहे.
आरसीबीने २०११ मध्ये ख्रिस गेलला सर्वप्रथम विकत घेतले होते. गेलच्या झंझावाती फलंदाजीमुळे आरसीबीने त्या वर्षी अंतिम फेरी गाठली होती. गेल २०१७ पर्यंत आरसीबीच्या संघात होता. त्याने या फ्रँचायझीसाठी ९१ सामन्यांत ४३.२९ च्या सरासरीने आणि १५४.४० च्या स्ट्राइक रेटने ३ हजार ४२० धावा केल्या आहेत. यामध्ये २१ अर्धशतक आणि ५ शतकांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या