मराठी बातम्या  /  Sports  /  Video: Virat Kohli Reacts After Fans Chant Rcb Rcb Outside Team India's Dressing Room

Virat Kohli: विराटनं एक इशारा काय केला, अवघा स्टेडियम गपगार झाला! पाहा नागपुरात काय घडलं?

Virat Kohli
Virat Kohli
Ganesh Pandurang Kadam • HT Marathi
Sep 24, 2022 07:08 PM IST

Virat Kohli Pointing Team India Logo: नागपूर इथं भारत-ऑस्ट्रेलियामध्ये सामना सुरू असताना विराट कोहली सोबत घडलेल्या एका प्रसंगाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Virat Kohli Pointing towards Team India Logo: भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली हा मैदानात असो की मैदानाबाहेर, मीडियाचे कॅमेरे जसे त्याच्यावर रोखलेले असतात, तशा चाहत्यांच्या नजराही त्याच्यावर खिळलेल्या असतात. मैदानात पाऊल ठेवताना विराट प्रत्येक वेळी एक वेगळीच ऊर्जा आणि उत्साह घेऊन आलेला असतो. भारतीय संघासाठी खेळत असो की आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघासाठी, तो नेहमीच सर्वशक्तीनिशी खेळत असतो.

ट्रेंडिंग न्यूज

विराट हा हजरजबाबीपणासाठीही ओळखला जातो. संघ सहकाऱ्यांची पाठराखण करतानाही तो परिणामांची पर्वा करत नाही. खेळाबरोबरच आपल्या अशा छोट्यामोठ्या कृतीतून तो चाहत्यांची मनं जिंकत असतो. भारत व ऑस्ट्रेलियामध्ये नागपूर इथं खेळल्या गेलेल्या सामन्याच्या वेळी देखील विराट कोहलीनं सर्वांची मनं जिंकली. तो किस्सा सध्या क्रिकेटप्रेमींमध्ये चवीनं चर्चिला जात आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी स्टेडियममध्ये उपस्थित काही प्रेक्षक 'आरसीबी, आरसीबी' अशा घोषणा देत विराट कोहलीचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होते. हे पाहून विराटनं काहीसा त्रस्त झाला. त्यानं स्वत:च्या जर्सीवरील लोगोकडं बोट दाखवलं आणि टीम इंडियाचा लोगो दाखवला. आजच्या सामन्यात मी आयपीएल फ्रँचायझीचं नव्हे तर भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करत आहे, असं सांगायचा प्रयत्न त्यानं केला. विराटच्या या कृतीनंतर प्रेक्षकांनाही आपली चूक उमजली आणि काही वेळातच घोषणाबाजी बंद झाली. तसंच, विराटवर कौतुकाचा वर्षाव सुरू केला. हे सगळं घडत असताना हर्षल पटेल (Harshal Patel) हा देखील तिथं उपस्थित होता. त्यानंही विराटचं अनुकरण करत स्वत:च्या जर्सीवरील लोगोकडं अंगुलीनिर्देश केला करत स्मित केलं.

विराट आणि त्याच्या चाहत्यांमध्ये घडलेल्या या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.