मराठी बातम्या  /  क्रीडा  /  VIDEO: ‘हे आहे वेस्ट इंडिज क्रिकेट...’ तुम्ही ‘असा’ प्रसंग कधीच पाहिला नसेल

VIDEO: ‘हे आहे वेस्ट इंडिज क्रिकेट...’ तुम्ही ‘असा’ प्रसंग कधीच पाहिला नसेल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 27, 2022 04:13 PM IST

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक त्याची मजा घेत आहेत. यावेळी एका यूजरने लिहिले की, हे वेस्ट इंडिज क्रिकेट आहे, आणि त्यामुळेच ते जगभरात पसंत केले जाते.

umpire
umpire (photo- social media)

वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना डॅरेन सॅमी मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान एक असे दृश्य पाहायला मिळाले आहे, जे तुम्ही याआधी क्वचितच पाहिले असेल. सामन्यादरम्यान, मैदानातून बाहेर धावत येत असताना अंपायरने फलंदाजाला बाद घोषित केले आहे. तसेच, आपला निर्णय दिल्यानंतर ते लगेच आपल्या रुमध्ये गेले. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

खुद्द वेस्ट इंडिज क्रिकेटनेही या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. सोबतच चाहत्यांना विचारले आहे की, तुम्ही असे दृश्य कधी पाहिले आहे का?

बांगलादेशच्या दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज केमार रोच ९ वे षटक टाकत होता. षटकातील पाचवा चेंडू फलंदाज इनामूल हकच्या पॅडला लागला, त्यानंतर वेस्ट इंडिज संघाने अपील केले. अंपायरने बॅट्समनला आऊट घोषित केले, पण इनामुलने अंपायरच्या निर्णयाला आव्हान देत रिव्हुव्ह घेतला. त्याचवेळी मुसळधार पाऊस सुरू झाला. अशा स्थितीत पंच सीमारेषेजवळ उभे राहून तिसऱ्या पंचाच्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहू लागले.

रिप्लेमध्ये चेंडू फलंदाजाच्या बॅटला न लागता थेट स्टम्पवर लागल्याचे दिसत होते. त्यानंतर थर्ड अंपायरनेही इनामुलला बाद घोषित केले. तिसऱ्या अंपायरने फलंदाजाला आऊट देताच पावसामुळे सामना थांबवण्याची घोषणा केली. थर्ड अंपायरचा निर्णय येताच मैदानातील अंपायरही आपले एक बोट वर करून मैदानाबाहेर धावले. यादरम्यान, कॉमेंटेटर्सनीही आपण असे दृश्य यापूर्वी पाहिले नसल्याचे सांगितले.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक त्याची मजा घेत आहेत. यावेळी एका यूजरने लिहिले की, हे वेस्ट इंडिज क्रिकेट आहे, आणि त्यामुळेच ते जगभरात पसंत केले जाते.

WhatsApp channel