Paris Olympics Medal Tally : चीन की अमेरिका… पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्ण पदकं कोणाकडे? पाहा-usa edge past china to claim top spot in paris olympics medal tally india 71st ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Paris Olympics Medal Tally : चीन की अमेरिका… पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्ण पदकं कोणाकडे? पाहा

Paris Olympics Medal Tally : चीन की अमेरिका… पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्ण पदकं कोणाकडे? पाहा

Aug 11, 2024 10:19 PM IST

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चीनसाठी खूप छान होते. यावेळी त्यांनी ऑलिम्पिकमध्ये दुसरे स्थान पटकावले. यावेळी ऑलिम्पिकमध्ये चीनकडे एकूण ४० सुवर्ण, २७ रौप्य आणि २४ कांस्य पदके आहेत. तर अमेरिकेच्या खात्यात ४० सुवर्ण, ४४ रौप्य आणि ४२ कांस्य पदके आहेत. चीनची एकूण पदकसंख्या ९१ आहे.

Paris Olympics Medal Tally : चीन की अमेरिका… पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्ण पदकं कोणाकडे? पाहा
Paris Olympics Medal Tally : चीन की अमेरिका… पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्ण पदकं कोणाकडे? पाहा (AP)

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा थरार आता संपला आहे. यावेळी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले होते. येथे ऑलिंपिक २०२४ चा शेवटचा इव्हेंट ११ ऑगस्ट रोजी खेळला गेला. हा महिलांच्या बास्केटबॉलचा सामना होता. या स्पर्धेत फ्रान्स आणि अमेरिकेचे महिला संघ आमनेसामने होते.

या सामन्याने ऑलिम्पिकमधील अमेरिकेचे वर्चस्व निश्चित केले. खरं तर, या ऑलिम्पिकमध्ये पदकतालिकेत अमेरिका आणि चीन यांच्यात चांगलीच चुरस रंगली होती.

अमेरिकेच्या महिला बास्केटबॉल संघाने फ्रान्सविरुद्धच्या विजयामुळे सुवर्णपदक जिंकले. जर अमेरिकेने हा सामना हरला असता तर त्यांची एकूण ३९ सुवर्णपदके राहिली असती आणि त्यांना पदकतालिकेत पहिले स्थान मिळवता आले नसते. पण तसे झाले नाही. हा सामना जिंकत अमेरिकेने ४० वे सुवर्णपदक कमावले.

ऑलिम्पिक पदकतालिकेत अमेरिका पहिल्या क्रमांकावर

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चीनसाठी खूप छान होते. यावेळी त्यांनी ऑलिम्पिकमध्ये दुसरे स्थान पटकावले. यावेळी ऑलिम्पिकमध्ये चीनकडे एकूण ४० सुवर्ण, २७ रौप्य आणि २४ कांस्य पदके आहेत. तर अमेरिकेच्या खात्यात ४० सुवर्ण, ४४ रौप्य आणि ४२ कांस्य पदके आहेत. चीनची एकूण पदकसंख्या ९१ आहे.

तर अमेरिकेने १२५ पदके जिंकली आहेत. ऑलिंपिकमध्ये पदकतालिकेची क्रमवारी सुवर्णपदकांवर आधारित असते.

ज्या देशाने सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली आहेत तो अव्वल स्थानावर असतो. जर सुवर्णपदकांची संख्या समान असेल तर रौप्य पदकांच्या आधारावर निर्णय घेतला जातो. या ऑलिम्पिकमध्ये १०० हून अधिक पदके जिंकणारा अमेरिका हा एकमेव देश आहे.

भारत कितव्या क्रमांकावर?

पॅरिस ऑलिम्पिक भारतासाठी निराशाजनक ठरले. या ऑलिम्पिकमध्ये भारताने केवळ ६ पदके जिंकली आहेत. ज्यामध्ये एकाही सुवर्णपदकाचा समावेश नाही. या ऑलिम्पिकमध्ये भारताने एक रौप्य आणि पाच कांस्यपदके जिंकली आहेत. त्यामुळे भारत ७१ व्या स्थानावर आहे.

TeamGoldSilverBronzeTotal
USA404442126
China40272491
Japan20121345
Australia18191653
France16252263

गेल्या वेळी भारताने एकूण ७ पदके जिंकली होती. ज्यात सुवर्णपदकाचाही समावेश होता. टोकियो ऑलिम्पिक २०२० हे भारतासाठी ऑलिम्पिक इतिहासातील सर्वोत्तम ठरले.

या ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा, मनू भाकर, सरबज्योत सिंग, स्वप्नील कुसळे आणि अमन सेहरावत यांनी भारतासाठी पदके जिंकली. भारता

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील भारताचे पदक विजेते

मनू भाकर- कांस्यपदक, नेमबाजी

मनू भाकर/सरबज्योत सिंग – कांस्य पदक, नेमबाजी

स्वप्नील कुसळे – कांस्यपदक, नेमबाजी

भारतीय हॉकी संघ - कांस्य पदक

नीरज चोप्रा- रौप्य पदक, ऍथलेटिक्स

अमन सेहरावत- कांस्यपदक, कुस्ती