WPL 2023: ग्रेस हॅरिसने गुजरातच्या जबड्यातून विजय हिसकावला, शेवटच्या षटकात १९ धावा करून सामना जिंकला
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WPL 2023: ग्रेस हॅरिसने गुजरातच्या जबड्यातून विजय हिसकावला, शेवटच्या षटकात १९ धावा करून सामना जिंकला

WPL 2023: ग्रेस हॅरिसने गुजरातच्या जबड्यातून विजय हिसकावला, शेवटच्या षटकात १९ धावा करून सामना जिंकला

Published Mar 05, 2023 11:14 PM IST

UP vs GUJ highlights wpl 2023 : रोमहर्षक सामन्यात यूपी वॉरियर्सने ३ विकेट्सने विजय मिळवला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना १६९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यूपीने २०व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर विजय मिळवला. हॅरिसने षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. यूपीकडून ग्रेस हॅरिसने २६ चेंडूत नाबाद ५९ धावा ठोकल्या. तिने ७ चौकार आणि ३ षटकार मारले.

UP vs GUJ highlights wpl 2023
UP vs GUJ highlights wpl 2023

Gujarat Giants Vs UP Warriorz WPL 2023 : महिला प्रीमियर लीगच्या (WPL 2023) आजच्या (५ मार्च) सामन्यात यूपीने गुजरातचा ३ गडी राखून पराभव केला आहे. गुजरातचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा पराभव आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने ६ गडी गमावत १६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात यूपीने एक चेंडू शिल्लक असताना ७ गड्यांच्या मोबदल्यात १७५ धावा करून सामना जिंकला.

यूपीकडून ग्रेस हॅरिसने २६ चेंडूत ५९ धावांची शानदार खेळी करत गुजरातच्या जबड्यातून सामना हिसकावून घेतला. या स्पर्धेत प्रथमच एखाद्या संघाने लक्ष्याचा पाठलाग करून विजय मिळवला आहे.

तत्पूर्वी, १७० धावांचा पाठलाग करताना यूपीने अवघ्या २० धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. यानंतर किरण नवगिरे आणि दीप्ती शर्मा यांनी अर्धशतकी भागीदारी करत डाव सांभाळला, पण कीम गर्थने ५ विकेट घेत गुजरातला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. मात्र, ती विजय मिळवून देऊ शकली नाही. शेवटी युपीच्या ग्रेस हॅरिसने झंझावाती अर्धशतक ठोकत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात १९ धावांची गरज होती. अॅनाबेल सदरलँडच्या या षटकात हॅरिसने ५ चेंडूत लक्ष्य गाठले.

गुजरातचा डाव 

तत्पूर्वी, गुजरातची कर्णधार स्नेह राणाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर एस मेघना आणि सोफीया डंकली यांनी वेगवान सुरुवात करून दिली. मात्र,चौथ्या ३४ धावांवर सोफीया डंकलीच्या रुपात गुजरातची पहिली विकेट पडली. तिला दीप्ती शर्माने क्लीन बोल्ड केले.

त्यानंतर गुजरातचे दोन विकेट लवकर गेल्या. त्यामुळे संघ दबावात आला. मात्र, ३ विकेट पडल्यानंतर हरलीन देओल आणि एशले गार्डर यांनी डाव सांभाळला. दोघींनी जबाबदारी खेळ केला. गुजरातकडून हरलीन देओलने सर्वाधिक ४६ धावांची शानदार खेळी केली. तर एशले गार्डनरने १९ चेंडूत २५ धावा केल्या. गार्डनरने २ चौकार आणि १ षटकार मारला. तर हरलीनने ३२ चेंडूत ७ चौकार मारले. शेवटी डी हेमलताने १३ चेंडूत २१ धावा ठोकल्या. तिने २ चौकार आणि १ षटकार मारला.

त्याचवेळी यूपीकडून दीप्ती आणि सोफीने प्रत्येकी २ गडी बाद केले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या