मराठी बातम्या  /  क्रीडा  /  UP Vs MI Highlights : मुंबई इंडियन्सचा सलग चौथा विजय, हरमनप्रीतचं शानदार अर्धशतक

UP Vs MI Highlights : मुंबई इंडियन्सचा सलग चौथा विजय, हरमनप्रीतचं शानदार अर्धशतक

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 12, 2023 07:09 PM IST

UP Warriorz Vs Mumbai Indians match score : महिला प्रीमियर लीगचा १० वा सामना आज (१२ मार्च) मुंबई इंडियन्स (MI) आणि यूपी वॉरियर्स (UPW) यांच्यात खेळला गेला. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने होते. यूपी वॉरियर्सची कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर युपीने १५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने १७.३ षटकात लक्ष्य गाठले.

UP Vs MI Live Score WPL 2023
UP Vs MI Live Score WPL 2023

WPL Cricket Score, UP vs MUM Women's IPL League 2023 : महिला प्रीमियर लीगचा १० वा सामना आज (१२ मार्च) मुंबई इंडियन्स (MI) आणि यूपी वॉरियर्स (UPW) यांच्यात खेळला जात आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. मुंबईने यापूर्वी तिन्ही सामने जिंकले असून गुणतालिकेत ते अव्वल स्थानावर आहेत. दुसरीकडे, यूपी वॉरियर्सने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. ते तिसऱ्या क्रमांकावर आहे. यूपी वॉरियर्सची कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर यूपीने २० षटकांत ६ बाद १५९ धावा केल्या.

UP Vs MI Score updates WPL 2023 :

मुंबई इंडियन्सने सामना जिंकला 

महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सची विजयाची मालिका सुरूच आहे. त्यांनी सलग चौथा सामना जिंकला आहे. मुंबईने यूपी वॉरियर्सचा ८ विकेट्सनी पराभव केला आहे.

या विजयासह मुंबईने स्पर्धेत सहभागी इतर चारही संघांचा पराभव केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला संघ ठरला आहे.

यूपी वॉरियर्सची कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यूपीने २० षटकांत ६ बाद १५९ धावा केल्या. मुंबईने १७.३ षटकात २ बाद १६४ धावा करत सामना जिंकला.

हरमन आणि नताली यांच्यात शतकी भागीदारी

मुंबईकडून हरमनप्रीत कौरने सर्वाधिक ५३ धावा केल्या. तिने ३३ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकार ठोकला. सोबतच नताली सीव्हर ब्रंट ३१ चेंडूत ४५ धावा करून नाबाद राहिली. हरमनप्रीत आणि नताली सिव्हर ब्रटं यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६६ चेंडूत नाबाद १०६ धावांची भागीदारी केली. त्याचवेळी यास्तिका भाटियाने २७ चेंडूत ४२ धावा केल्या. हीली मॅथ्यूज १७ चेंडूत १२ धावाच करू शकली. यूपीकडून राजेश्वरी गायकवाड आणि सोफी एक्लेस्टोनने प्रत्येकी एक विकेट घेतली.

UPW vs MI Live score: मुंबईचे सामन्यात पुनरागमन

सलग दोन फलंदाज गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सने सामन्यात पुनरागमन केले आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अनुभवी खेळाडू नताली सीव्हर ब्रंट यांनी डाव सावरला आहे. दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. मुंबईने १४ षटकांत २ बाद १११ धावा केल्या आहेत. 

UPW vs MI Live score: मुंबईला दोन षटकांत दोन धक्के

पॉवरप्लेनंतर मुंबई इंडियन्सला दोन धक्के बसले. राजेश्वरी गायकवाडने सातव्या षटकात यस्तिका भाटियाला बाद केले. यास्तिका २७ चेंडूत ४२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. तिच्या पाठोपाठ हिली मॅथ्यूजही पुढच्याच षटकात बाद झाली. सोफी एक्लेस्टोनने तिला झेलबाद केले. मॅथ्यूजने १७ चेंडूत १२ धावा केल्या. सध्या मुंबईने आठ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात ५९ धावा केल्या आहेत. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि नताली सीव्हर ब्रंट क्रीजवर आहेत.

UPW vs MI Live score: पॉवरप्लेमध्ये मुंबईच्या ५१ धावा

मुंबई इंडियन्सची सलामीवीर यस्तिका भाटिया आणि हीली मॅथ्यूज यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मुंबईने सहा षटकात बिनबाद ५१ धावा केल्या आहेत. यास्तिका भाटिया २५ चेंडूत ३६ आणि हीली मॅथ्यूज १२ चेंडूत ११ धावांवर खेळत आहे.

UPW vs MI Live score: मुंबईची शानदार सुरुवात

लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली आहे. त्यांनी तीन षटकांत २४ धावा केल्या आहेत. यास्तिका भाटिया ११ चेंडूत १५ आणि हीली मॅथ्यूज सात चेंडूत ९ धावा खेळत आहे.

UPW vs MI Live score: यूपी वॉरियर्सच्या १५९ धावा

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना यूपी वॉरियर्स संघाने २० षटकांत ६ बाद १५९ धावा केल्या आहेत. मुंबईला १६० धावांचे लक्ष्य मिळाले आहे. यूपीकडून कर्णधार अॅलिसा हिलीने सर्वाधिक ५८ धावा केल्या. ताहलिया मॅकग्राने ५० धावांची खेळी केली. किरण नवगिरेने १७ धावांचे योगदान दिले.

सिमरन शेखने ९, दिप्ती शर्माने ७ आणि देविका वैद्यने ६ धावा केल्या. सोफी एक्लेस्टोनला केवळ एक धाव करता आली. श्वेता सेहरावत दोन धावा करून नाबाद राहिली. मुंबईकडून सायका इशाकने ३ बळी घेतले. अमेलिया केरला दोन बळी मिळाले. हिली मॅथ्यूजने एक विकेट घेतली.

UPW vs MI Live score: यूपी वॉरियर्सला तिसरा धक्का 

यूपी वॉरियर्सला १६व्या षटकात तिसरा धक्का बसला. कर्णधार अॅलिसा हिली ५८ धावा करून बाद झाली. तिला सायका इशाकने एलबीडब्ल्यू केले. हेलीने तिसऱ्या विकेटसाठी ताहलिया मॅकग्रासोबत ८२ धावांची भागीदारी केली. मॅकग्रानेही आपले अर्धशतक पूर्ण केले आहे.

UPW vs MI Live score: यूपी वॉरियर्सचे दोन फलंदाज बाद

अमेलिया केरने यूपी वॉरियर्सला दुसरा धक्का दिला. सातव्या षटकातील चौथ्या चेंडूवर तिने किरण नवगिरेला बाद केले. किरण १४  चेंडूत १७ धावा करून यस्तिका भाटियाकरवी झेलबाद झाली. किरण बाद झाल्यानंतर ताहलिया मॅकग्रा क्रीझवर आली आहे.

UPW vs MI Live score: UP वॉरियर्सचा पॉवरप्ले संपला

यूपी वॉरियर्सच्या डावाचा पॉवरप्ले संपला आहे. त्यांनी ६ षटकात एका विकेट गमावून ४८ धावा केल्या आहेत. कर्णधार अॅलिसा हिली २१ चेंडूत ३० धावा करून खेळत आहे. तर किरण नवगिरेने १० चेंडूत सात धावा केल्या.

UP Vs MI Live Score : दोन्ही प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स : यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हिली मॅथ्यूज, नताली सिव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), धारा गुजर, अमेलिया केर, इस्सी वाँग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतिमनी कलिता, सायका इशाक.

यूपी वॉरियर्स: देविका वैद्य, एलिसा हिली (विकेटकीपर/कर्णधार), श्वेता सेहरावत, किरण नवगिरे, ताहलिया मॅकग्रा, दीप्ती शर्मा, सिमरन शेख, सोफी एक्लेस्टोन, शबनम इस्माईल, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड.

UP Vs MI Live Score : मुंबई इंडियन्स प्रथम गोलंदाजी करेल

यूपी वॉरियर्स संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यूपीने प्लेइंग-११ मध्ये एक बदल केला. ग्रेस हॅरिस अनफिट असल्यामुळे या सामन्यात खेळत नाहीये. तिच्या जागी शबनम इस्माईलला संधी मिळाली आहे. मुंबईच्या संघातदेखील एक बदल झाला आहे. पूजा वस्त्राकर या सामन्यातून बाहेर आहे. तिच्या जागी धारा गुजर सामना खेळत आहे.

WhatsApp channel