मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Haris Rauf: १९ व्या षटकांत सलग २ विकेट, त्यानंतर थरारक रनआऊट, पाकिस्ताननं असा जिंकला सामना

Haris Rauf: १९ व्या षटकांत सलग २ विकेट, त्यानंतर थरारक रनआऊट, पाकिस्ताननं असा जिंकला सामना

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 26, 2022 11:18 AM IST

Pakistan vs England 4th T20I Highlights: पाकिस्तानच्या संघाने पुन्हा एकदा T20I मालिकेत बरोबरी साधली आहे. कराचीमध्ये खेळल्या गेलेल्या रोमांचक सामन्यात इंग्लंड संघाला ३ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. मालिका आता २-२ अशी बरोबरीत आहे.

Haris Rauf
Haris Rauf

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात ७ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडचा अवघ्या ३ धावांनी पराभव केला आहे. त्यामुळे मालिका २-२ अशी बरोबरीत आली आहे.

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १६६ धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिजवानने सर्वाधिक ६७ चेंडूत ८८ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडला १९.२ षटकांत १६३ धावाच करता आल्या. वेगवान गोलंदाज हारिस रौफने अप्रतिम गोलंदाजी करत पाकिस्तानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

शेवटच्या तीन षटकांचा थरार

इंग्लंडला १८ चेंडूत ३३ धावांची गरज होती. ऑलराऊंडर रिचर्ड डॉसन आणि आदिल रशीद मैदानात होते. १८ वे षटक टाकण्यासाठी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने चेंडू मोहम्मद हसनैनच्या हातात दिला. डॉसनने त्या षटकात २४ धावा चोपल्या. त्यानंतर आता इंग्लंडला विजयासाठी १२ चेंडूत अवघ्या ९ धावांची गरज होती. रिचर्ड डॉसन १४ चेंडूत ३० धावांवर खेळत होता. पाकिस्तानी चाहत्यांनी विजयाची आशा सोूडून दिली होती.

मात्र, १९ व्या षटकात हारिस रौफने सामना फिरवला. त्याने १९ व्या षटकात डॉसन आणि ओली स्टोन यांना सलग चेंडूंवर बाद केले. त्या षटकात रौफने ५ धावांत २ बळी घेतले. त्यामुळे शेवटच्या षटकात इंग्लंडकडे फक्त एक विकेट होती आणि ४ धावा हव्या होत्या. २० वे षटक मोहम्मद वसीम जूनियर घेऊन आला. स्ट्राईकवर इंग्लंडचा शेवटच्या क्रमांकावरचा फलंदाज होता. त्याला पहिल्या चेंडूवर एकही धाव करता आली नाही. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर आदिल राशिदला स्ट्राईक देण्याच्या नादात रीसी टोपली धावबाद झाला. लेग साईडवर शॉट खेळून त्याने धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण सर्कलमध्ये उभ्या असलेल्या शान मसूदने नॉन स्ट्राइक एंडला थ्रो मारत टोपलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अशा प्रकारे पाकिस्तानने सामना ३ धावांनी जिंकला.

WhatsApp channel

संबंधित बातम्या