मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Umran Malik: फलंदाज जखमी होतील म्हणून बॉलिंग करण्यास रोखलं होतं, आज टीम इंडियात

Umran Malik: फलंदाज जखमी होतील म्हणून बॉलिंग करण्यास रोखलं होतं, आज टीम इंडियात

26 June 2022, 21:39 IST Rohit Bibhishan Jetnavare
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
26 June 2022, 21:39 IST
  • टीम इंडिया आणि आयर्लंड यांच्यात आज डब्लिनमध्ये टी-२० मालिकेतील पहिला सामना होणार आहे. या सामन्यातून भारताचा तुफानी गोलंदाज उमरान मलिक आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या हस्ते त्याला टी-२० कॅप देण्यात आली. T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो भारताकडून ९८ वा खेळाडू आहे.
उमरान मलिकचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळणार आहे. उमरानने रविवारी (२६ जून) हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली डब्लिनमध्ये आयर्लंडविरुद्ध पदार्पण केले. मूळचा जम्मू-काश्मीरचा असलेल्या या वेगवान गोलंदाजाचा प्रवास हा मुळीच सोपा नव्हता.

(1 / 10)

उमरान मलिकचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळणार आहे. उमरानने रविवारी (२६ जून) हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली डब्लिनमध्ये आयर्लंडविरुद्ध पदार्पण केले. मूळचा जम्मू-काश्मीरचा असलेल्या या वेगवान गोलंदाजाचा प्रवास हा मुळीच सोपा नव्हता.

जम्मूतील नेट गोलंदाजापासून ते आयपीएलमध्ये दिग्गज फलंदाजांसमोर आपल्या तुफानी गोलंदाजीने छाप पाडणाऱ्या उमरानची कहाणी खूपच रंजक आहे. उमरानचे वडील फळांचे दुकान चालवतात. मुलाने शिकून कुटुंबाचे नाव रोशन करावे अशी त्यांची इच्छा होती, पण नंतर त्यांनीच आपल्या पत्नीसह उमरानला प्रोफेशनल क्रिकेटर बनण्याची प्रेरणा दिली.

(2 / 10)

जम्मूतील नेट गोलंदाजापासून ते आयपीएलमध्ये दिग्गज फलंदाजांसमोर आपल्या तुफानी गोलंदाजीने छाप पाडणाऱ्या उमरानची कहाणी खूपच रंजक आहे. उमरानचे वडील फळांचे दुकान चालवतात. मुलाने शिकून कुटुंबाचे नाव रोशन करावे अशी त्यांची इच्छा होती, पण नंतर त्यांनीच आपल्या पत्नीसह उमरानला प्रोफेशनल क्रिकेटर बनण्याची प्रेरणा दिली.(instagram, umran malik)

उमरानची कहाणी खूपच रंजक आहे. २०१७ पर्यंत त्याला प्रोफेशनल क्रिकेटबद्दल फारशी माहिती नव्हती. तो जम्मूमधील टेनिस बॉल क्रिकेटचा स्टार होता. एके दिवशी त्याचा मित्र अब्दुल समदने त्याला त्याचे प्रशिक्षक रणधीर मन्हास यांना भेटायला लावले. जेव्हा रणधीर यांनी उमरानला नेटमध्ये गोलंदाजी करताना पाहिलं तेव्हा ते अवाक् झाले.

(3 / 10)

उमरानची कहाणी खूपच रंजक आहे. २०१७ पर्यंत त्याला प्रोफेशनल क्रिकेटबद्दल फारशी माहिती नव्हती. तो जम्मूमधील टेनिस बॉल क्रिकेटचा स्टार होता. एके दिवशी त्याचा मित्र अब्दुल समदने त्याला त्याचे प्रशिक्षक रणधीर मन्हास यांना भेटायला लावले. जेव्हा रणधीर यांनी उमरानला नेटमध्ये गोलंदाजी करताना पाहिलं तेव्हा ते अवाक् झाले.(instagram, umran malik)

उमरान तेव्हापर्यंत रोज प्रशिक्षणही घेत नव्हता. मनहासने त्याला सांगितले की, तू एक दिवस भारतासाठी खेळू शकतोस. या विधानानंतर उमरानचे आयुष्यच बदलून गेले. त्यानंतर त्याने क्रिकेटला गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर उमरानने एकही दिवस ट्रेनिंग थांबवली नाही.

(4 / 10)

उमरान तेव्हापर्यंत रोज प्रशिक्षणही घेत नव्हता. मनहासने त्याला सांगितले की, तू एक दिवस भारतासाठी खेळू शकतोस. या विधानानंतर उमरानचे आयुष्यच बदलून गेले. त्यानंतर त्याने क्रिकेटला गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर उमरानने एकही दिवस ट्रेनिंग थांबवली नाही.(instagram, umran malik)

यानंतर उमरानने जम्मू अंडर-१९ क्रिकेट संघासाठी ट्रायल दिली. जम्मूच्या ज्युनियर संघात त्याची निवड झाली. विनू मंकड ट्रॉफीमध्ये उमरानला केवळ एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. यानंतर २३ वर्षांखालील चाचण्यांमध्ये नशिबाने त्याला साथ दिली नाही.

(5 / 10)

यानंतर उमरानने जम्मू अंडर-१९ क्रिकेट संघासाठी ट्रायल दिली. जम्मूच्या ज्युनियर संघात त्याची निवड झाली. विनू मंकड ट्रॉफीमध्ये उमरानला केवळ एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. यानंतर २३ वर्षांखालील चाचण्यांमध्ये नशिबाने त्याला साथ दिली नाही.(instagram, umran malik)

२०१९-२० रणजी ट्रॉफी सीझनमध्ये जम्मू आणि काश्मीर आसाम विरुद्ध खेळणार होते. माजी भारतीय यष्टीरक्षक आणि आसामचे प्रशिक्षक अजय रात्रा यांनी काही गोलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी बोलावले. त्यात उमरान मलिकचाही समावेश होता.

(6 / 10)

२०१९-२० रणजी ट्रॉफी सीझनमध्ये जम्मू आणि काश्मीर आसाम विरुद्ध खेळणार होते. माजी भारतीय यष्टीरक्षक आणि आसामचे प्रशिक्षक अजय रात्रा यांनी काही गोलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी बोलावले. त्यात उमरान मलिकचाही समावेश होता.(instagram, umran malik)

उमरान मलिकला आसामच्या फलंदाजांसमोर नेटमध्ये गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्याचा वेग पाहून अजय रात्रा हे ही अवाक् झाले. आपले फलंदाज जखमी होण्यापासून वाचवण्यासाठी रात्रा यांनी उमरानला गोलंदाजी करण्यापासून रोखले. अवघ्या चार चेंडूनंतर उमरानला गोलंदाजी करण्यापासून रोखले गेले.

(7 / 10)

उमरान मलिकला आसामच्या फलंदाजांसमोर नेटमध्ये गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्याचा वेग पाहून अजय रात्रा हे ही अवाक् झाले. आपले फलंदाज जखमी होण्यापासून वाचवण्यासाठी रात्रा यांनी उमरानला गोलंदाजी करण्यापासून रोखले. अवघ्या चार चेंडूनंतर उमरानला गोलंदाजी करण्यापासून रोखले गेले.(instagram, umran malik)

उमरानच्या गोलंदाजीवर अजय रात्रा इतके प्रभावित झाले होते की, त्यांनी याबाबत जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनशी चर्चा केली. तसेच, त्यांनी उमरानला जम्मू-काश्मीरच्या संघात घेण्याची शिफारस केली. एवढी वेगवान गोलंदाजी करणारा खेळाडू राज्याच्या संघात नसल्याने रात्रा आश्चर्यचकित झाले होते.

(8 / 10)

उमरानच्या गोलंदाजीवर अजय रात्रा इतके प्रभावित झाले होते की, त्यांनी याबाबत जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनशी चर्चा केली. तसेच, त्यांनी उमरानला जम्मू-काश्मीरच्या संघात घेण्याची शिफारस केली. एवढी वेगवान गोलंदाजी करणारा खेळाडू राज्याच्या संघात नसल्याने रात्रा आश्चर्यचकित झाले होते.(instagram, umran malik)

रात्रा यांच्यानंतर उमरान मलिक हा भारताचा माजी स्विंग स्टार इरफान पठाणच्या नजरेस पडला. इरफानही त्याच्यावर खूपच प्रभावित झाला होता. या वरिष्ठ खेळाडूंनी त्याचे कौतुक केल्याने उमरानचे नशीबच पालटले. त्यानंतर त्याचा जम्मूच्या संघात समावेश करण्यात आला.

(9 / 10)

रात्रा यांच्यानंतर उमरान मलिक हा भारताचा माजी स्विंग स्टार इरफान पठाणच्या नजरेस पडला. इरफानही त्याच्यावर खूपच प्रभावित झाला होता. या वरिष्ठ खेळाडूंनी त्याचे कौतुक केल्याने उमरानचे नशीबच पालटले. त्यानंतर त्याचा जम्मूच्या संघात समावेश करण्यात आला.(instagram, umran malik)

सनरायझर्स हैदराबादने उमरान मलिकला आयपीएल २०२१ साठी नेट बॉलर म्हणून निवडले होते. नियमित संघातील सदस्य टी नटराजन दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर उमरानचा संघात समावेश करण्यात आला. तसेच, आयपीएल २०२२ च्या ऑक्शनमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या फ्रेचायझीकडून त्याला रिेटेन करण्यात आले होते. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर उमरानची टीम इंडियामध्ये निवड झाली.

(10 / 10)

सनरायझर्स हैदराबादने उमरान मलिकला आयपीएल २०२१ साठी नेट बॉलर म्हणून निवडले होते. नियमित संघातील सदस्य टी नटराजन दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर उमरानचा संघात समावेश करण्यात आला. तसेच, आयपीएल २०२२ च्या ऑक्शनमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या फ्रेचायझीकडून त्याला रिेटेन करण्यात आले होते. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर उमरानची टीम इंडियामध्ये निवड झाली.(Twitter, BCCI)

इतर गॅलरीज